‘या’ अभिनेत्याने  आठवड्यात साइन केले होते १५ सिनेमे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 
खलनायकाच्या भूमिकेकडून नायकाच्या भूमिकेकडे यशस्वी प्रवास करणारे  बॉलिवूड अभिनेता विनोद खन्ना आज आपल्यात असते तर ते आज  ७२ वर्षांचे असते. परंतु  कॅन्सरमुळे २७ एप्रिल २०१७ रोजी त्यांचे निधन झाले. ६ ऑक्टोबर १९४६ रोजी पाकिस्तानच्या पेशावरमध्ये जन्मलेल्या विनोद यांच्या आयुष्याची कहाणी एखाद्या सिनेमापेक्षा कमी नव्हती. मध्यमवर्गीय कुटुंबातील विनोद बॉलिवूड अभिनेता होण्यापासून ओशो यांच्याशी प्रभावित होऊन वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणण्यापर्यंत ते चर्चेत राहिले होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2038a8d0-c979-11e8-bf34-51cac2570f39′]
विनोद यांचा ‘मन की मीत’ हा पहिला सिनेमा होता. सिनेमाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. त्यानंतर एक आठवड्यात विनोद यांनी जवळपास १५  सिनेमे साइन केले.विनोद खन्ना यांच्या वडिलांचा त्यांच्या चित्रपटात काम करण्याला विरोध होता. विनोद खन्नानी खूप विनंती केल्यानंतर वडिलांनी सांगितले, की दोन वर्षांत काहीच करू शकला नाही तर फॅमिली बिझनेस सांभाळायचा. १९७१ साली प्रदर्शित झालेला ‘हम तुम और वो’ हा त्यांचा नायक म्हणून पहिला चित्रपट होता. ‘अमर अकबर अँथनी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘ज़मीर’, ‘हेराफेरी’, ‘बर्निंग ट्रेन’ हे विनोद खन्ना यांचे विशेष गाजलेले चित्रपट होते.