‘या’ अभिनेत्यानं त्याचं 35 खोल्यांचं हॉटेल बनवलं ‘क्वारंटाईन’ सेंटर ! ‘यानं’च खरेदी केलाय विजय माल्याचा ‘व्हिला’

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशता सुरू असलेला कोरोनाचा प्रकोप पाहून जो तो मदतीसाठी पुढे येताना दिसत आहे. किंग शाहरुख खाननं अलीकडेच आपलं ऑफिस क्वारंटाईन सेंटर म्हणून देऊ केलं आहे. यानंतर आता अभिनेता सचिन जोशी यानंही मदतीचा हात दिला आहे. त्यानंही आपल्या हॉटेलचं क्वारंटाईन सेंटर बनवलं आहे. सचिन जोशी यानं याआधीच विजय माल्याचा व्हिला खरेदी केला आहे.

सचिन जोशीच्या या हॉटेलबद्दल बोालयचं झालं तर हे हॉटेल 36 खोल्याचं आहे. याचं नाव बीटल आहे. हे हॉटेल मुंबईच्या पनवेल भागात आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार, सचिन म्हणाला, “मुंबईमध्ये पुरेसे हॉस्पिटल आणि बेड नाहीत जे आपल्या शहराला वाचवतील.

एका रिपोर्टनुसार, सचिन म्हणाला, “बीएमसीनं मला यासंदर्भात मदत मागितली ज्याला मी त्वरीत होकार दिला. मी माझ्या हॉटेलचं रुपांतर बीएमसीच्या मदतीनं क्वारंटाईन सेंटरमध्ये केलं आहे. इथं अनेक लोक राहू शकतात. हॉटेलमधील खोल्या सॅनिटाईज केल्या आहेत.

सचिन जोशीनं विजय माल्याचा किंगफिशर व्हिलाही खरेदी केला आहे. हा व्हिला गोव्यात आहे. याचा लिलाव एसबीआयनं 2017 साली केला होता. 12350 सक्वे. फूटमधील हा व्हिला सचिननं जवळपास 73 कोटींना खरेदी केला होता.

View this post on Instagram

Pinky & ponky..!! @urvashiamrrahs

A post shared by Sachiin Joshi (@sachiinjjoshi) on