‘हा’ तामिळ अभिनेता ’83’ मध्ये दिसणार क्रिकेटर श्रीकांतच्या भूमिकेत 

मुंबई : वृत्तसंस्था – 2018 मध्ये धमाकेदार चित्रपट दिल्यानंतर आता रणवीर सिंग आगामी चित्रपट ’83’ च्या तयारीला लागला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग क्रिकेटर कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून रणवीर पहिल्यांदाच क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. 1983 मध्ये भारताने पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला या ऐतिहासिक घटनेवर चित्रपटाची कथा असणार आहे. या चित्रपटाचे डायरेक्शन कबीर खान करणार असून या चित्रपटासाठी खास स्टार कास्टची निवड ही करण्यात आली आहे.

सूत्रानुसार या चित्रपटात तामिळ अभिनेता जीवा हा क्रिकेटर कृष्णामचारी श्रीकांत यांच्या भूमिकेत दिसणार आहे. एका मुलाखतीत निर्माते मधु मंतेना यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले जेव्हा मी जीवाचा KO चित्रपट पहिला तेव्हा पासून तो माझा फेव्हरेट झाला आहे. त्याचा हा चित्रपट मला हिंदी मध्ये बनवायचा होता परंतु आता मला त्याच्या सोबत काम करायची संधी मिळाली आहे. मी जीवाचा खूप मोठा प्रशंसक आहे. मला असं वाटत की श्रीकांत यांची भूमिका पडद्यावर जीवा पेक्षा दुसरं कोणीही योग्य पद्धतीने करणार नाही. ’83’ या चित्रपटातून जीवा बॉलिवूडमध्ये पदार्पणही करणार आहे.

या विषयी जीवा म्हणाला ‘मी एक क्रिकेट प्रेमी आहे. आणि जेव्हा मला क्रिकेटर श्रीकांत यांच्या भूमिकेविषयी विचारण्यात आले आणि ते सुद्धा हिंदी चित्रपटात तेव्हा मला खूप आंनद झाला. मी ’83’  चित्रपटाच्या शूटिंगला सुरवात होण्याची आतुरतेने वाट पहात आहे’ रणवीर सिंगने गेल्यावर्षी ‘पद्मावत’ आणि ‘सिम्बा’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले. आणि 14 फेब्रुवारीला रणवीरचा गली बॉय रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणवीर एका रॅपर च्या भूमिकेत दिसणार आहे.