तानाजी चित्रपटात ‘हा’ अभिनेता बनणार शिवाजी महाराज 

मुंबई : वृत्तसंस्था 
सध्या ऐतिहासिक चित्रपटांचा बोलबाला आहे. तानाजी मालुसरे या शूर मावळ्याचा पराक्रम आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.अभिनेता अजय देवगण ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f74a263c-c6d7-11e8-902f-fdd935bd193a’]
अजय देवगण या चित्रपटात तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेत कोण दिसणार, याबद्दल जाणून घेण्यास चाहते फार उत्सुक  होते. या भूमिकेसाठी बॉलिवूडच्या नवाबची वर्णी लागल्याची माहिती मिळाली आहे. सैफ अली खान या चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे.

[amazon_link asins=’B01N6EZ2MI,B078RKPPGP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3766f5fb-c6d8-11e8-aae5-9d6322e22032′]

या ऐतिहासिक विषयावरील चित्रपटामध्ये  छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करण्याचा प्रस्ताव अजयने सैफला दिला आहे, असे समजते आहे. या प्रस्तावावर सैफ फारच गांभीर्याने विचार करतो आहे. हा प्रस्ताव त्याच्याकडून नाकारला जाण्याची शक्‍यता फारच कमी आहे. तानाजीमध्ये शिवाजी महाराजांच्या पत्नीचा रोल काजल साकारण्याचीही शक्‍यता आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत करतो आहे. या सिनेमाचे बजेट जवळपास १५० कोटींचे आहे. यातील सर्वाधिक खर्च वीएफएक्सवर करण्यात येणार आहे.

वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणला हत्ती मात्र हत्तीनेच घेतला बळी 

या विषयी सैफने अद्याप कोणतेही उत्तर दिले नसून तो यावर विचार करत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे जर सैफने या चित्रपटाची ऑफरस्विकारली तर तो शिवाजी महाराज यांच्या भूमिकेमध्ये दिसून येईल.