‘या’ हॉलिवूड अभिनेत्याच्या मुलीचे नाव आहे ‘इंडिया’, कारण वाचून थक्क व्हाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूडमधील प्रसिद्ध कॅरेक्टर थॉर आपल्या सर्वांना माहीतच आहे. थॉरची भूमिका साकारणारा अभिनेता क्रिस हेम्सवर्थ आता मेन इन ब्लॅक या आगामी सिनेमात दिसणार आहे. मेन इन ब्लॅक- इंटरनॅशनल हा सिनेमा 14 जून रोजी रिलीज होण्यासाठी तयार आहे. क्रिस आपल्या सिनेमामुळे तर चर्चेत आहे परंतु याला आणखी एक कारण आहे ते म्हणजे क्रिसच्या मुलीचं नाव.

तुम्हाला सांगू इच्छितो की, क्रिसच्या मुलीचं नाव इंडिया आहे. आपल्या मुलीच्या नावामुळे क्रिस पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवाय क्रिसने आपल्या मुलीचं नाव इंडिया का ठेवलं याचा खुलासा नुकताच त्याने एका मुलाखतीत केला आहे. याचे कारण म्हणजे त्याची पत्नी एल्सा पातकी आहे. क्रिस म्हणाला की, “माझ्या पत्नीने सर्वाधिक काळ भारतात व्यतित केला आहे. हेच कारण आहे की मी माझ्या मुलीचं नाव इंडिया ठेवलं आहे.”

याच मुलाखतीत बोलताना क्रिसने इंडियाबद्दल म्हणजेच भारत देशावरही भाष्य केलं. भारताबद्दलच्या त्याच्या काय भावना आहेत हे क्रिसने बोलून दाखवले. मुलाखतीत पुढे बोलताना क्रिस म्हणाला की, “माझ्या पत्नीलाच नाही तर मलाही भारत देश खूप आवडतो. इथे शुट करण्याचा अनुभव थोडा भीतीदायक परंतु खूपच मजेदार होता. मला शुट करताना अगदी रॉकस्टारसारखं फील होत होतं.” असेही क्रिसने स्पष्ट केले. क्रिसच्या बोलण्यातून त्याला भारताविषयी वाटणारे प्रेम आणि आदर व्यक्त होताना दिसत आहे.