नरेंद्र मोदींच्या पुन्हा पंतप्रधान बनण्याने ‘या’ अभिनेत्रीला वाटते भीती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक 2019 मध्ये विजयी होत नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील. त्यांच्या पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्याने त्यांचे समर्थक पार्टीचे कार्यकर्तेही खूपच खुश असल्याचे दिसत आहे. तु्म्हाला सांगू इच्छितो की, अनेक बॉलिवूड कलाकारांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. एका अभिनेत्रीने बॉलिवूडमधील कलाकरांसोबतचा मोदींचा फोटो शेअर करत त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

Narendra-Modi

इम्रान खान सोबत डेली बेली या सिनेमात दिसलेली अभिनेत्री पूर्णा जगन्नाथने एक चर्चित फोटो शेअर केला आहे ज्यात नरेंद्र मोदी, करण जोहर, रणवीर सिंग, रणबीर कपूर, एकता कपूर, आयुष्मान खुराना, राजकुमार राव यांसारखे अनेक कलाकार आहेत. पूर्णाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “मी एकटीच आहे का जिला भीती वाटत आहे ? एकही जण या गोष्टीने चिंतीत दिसत नाही की, एक हिंदू राष्ट्रवाद मूवमेंट दुसऱ्या समुदायातील लोकांना देशापासून वेगळं करण्यासाठी प्रतिबद्ध झाल्याचे दिसत आहे. जर तुम्ही या गोष्टीला सेलिब्रेट करत असाल आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्यावर टीका करत असाल तर तु्म्ही पूर्णपणे गप्प बसायला हवं.

एचबीओचा शो द नाईट ऑफ मध्ये पूर्णाने साकारलेली भूमिका सफर खान चांगलीच चर्चेत आल्याचे दिसून आले. आमिर खान निर्मित डेली बेली मध्येही ती झळकली होती.

Loading...
You might also like