‘या’ अभिनेत्रीने पहिल्यांदाच केले ‘स्काय डायव्हिंग’ आणि…. व्हिडाओ झाला व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचाने तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या तो व्हिडीओ सोशलवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. यात ती स्काय डायव्हिंग करताना दिसत आहे. त्यात ती पॅराशूटने खाली उतरताना तिने 15 फुटांवरून उडी मारल्याचे दिसत आहे. सध्या ती सुट्टीसाठी ऑस्ट्रेलियाला गेली असून तेथेच ती एन्जॉय करताना दिसत आहे.

नुसरत तिच्या पूर्ण फॅमिलीला घेऊन ऑस्ट्रेलियाला गेली आहे. नुसरत हिचा स्काय डायव्हिंगचा हा पहिलाच अनुभव होता. त्यात सुरुवतीला ती थोडी घाबरत असल्याचेही दिसत आहे. ती घाबरल्यामुळे स्काय डायव्हिंग करताना तिने सोबत निर्देशकलाही घेतले आहे. नुसरतने आपल्या व्हिडीओला खास कॅप्शनदेखील दिले आहे. त्यात ती म्हणते की, “मला उडण्याची खूप इच्छा होती. ती स्काय डायव्हिंगमुळे पूर्ण झाली.

 

 

नुसरतचा प्रेमकथेवर आधारीत एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ड्रीम गर्ल असे या चित्रपटाचे नाव आहे. आयुष्मान खुराना देखील तिच्यासोबत अभिनय करताना दिसणार आहे. तोही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

 

 

 

नुसरत आपल्या अनेक बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे अनेक बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. तिचे सोशलवर अनेक चाहते आहेत. तिच्या अभिनयामुळे अनेक लोक तिच्या प्रेमात आहेत. तिच्या फोटोंना तिचे चाहते मोठ्या प्रमाणात लाईक करत असतात. सध्या ती व्हीडीओमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.