अभिनेत्री कियारा आडवाणीचा गौप्यस्फोट ; ‘त्याने’ माझे ‘ग्रेड’ वाढविण्यास मदत केली, पण आईने ‘पकडले’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपट ‘कबीर सिंह’ हा सुपरहिट झाल्यानंतर अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केली. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कियाराने आपल्या खाजगी जीवनाबद्दल मोठा खुलासा केला. कियाराने एका मुलाखतीतत सांगितले की, तिला बॉयफ्रेंड हवा आहे. मुलाखतीत तिला विचारले गेले की, तुला बॉयफ्रेंड कसा हवा आहे ?

कियाराने उत्तर दिले की, असा असला पाहिजे जो एक्सप्रेसिव्ह असेन. जर तो माझ्यावर प्रेम करत असेल तो त्याने माझ्याकडे प्रेम व्यक्त केले पाहिजे. बॉयफ्रेंड ईमानदार असायला पाहिजे. या व्यतिरिक्त तो रॉयल असला पाहिजे. त्याची पर्सनॅलिटी चांगली असावी.

प्रमोशनच्या वेळी कियारा आडवाणीने आपल्या एक्स बॉयफ्रेंडविषयी चर्चा केली. कियाराने सांगितले की, ‘एक व्यक्ती असा होता ज्याच्यासोबत मी खूप काळ रिलेशनशिपमध्ये होते. आम्ही सोबत मोठे झालो. आमचे नाते खूप वेगळे होते. २०१० मध्ये आमच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली होती. त्याच्यासोबत माझ्या आईने मला पकडले. आईने तेव्हा सांगितले होते की, त्या मुलासोबत बोलायचे नाही. पण माझा बॉयफ्रेंड थोडा वेडा होता. त्याने माझे ग्रेड वाढविण्यास मला मदत केली होती. आज तो माझा चांगला मित्र आहे. त्याच्याकडे मी माझ्या सगळ्या गोष्टी शेअर करत असते. ‘

https://www.instagram.com/p/Byc4aVNn2pl/

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या