…म्हणून आता टीव्ही शोमध्ये दिसणार नाही ‘ही’ अभिनेत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री समैरा रावबाबत वाईट बातमी समोर आल्याचे दिसत आहे. जी तिच्या चाहत्यांना चिंतेत टाकू शकते. आपण सर्वांनी शेवटचे तिला त्रदेविया या शोमध्ये पाहिले आहे. शिवाय तेनाली रामा मालिकेतून ती 2 वर्षांनंतर टीव्हीमध्ये पुनरागमन करण्यास तयार होती परंतु आता असे होणार नाही. बॉलिवूड रिपोर्ट्सनुसार, शुटींगच्या पहिल्याच दिवशी या अभिनेत्रीचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे ती आता शोमधून बाहेर पडली आहे.

समैरा राव म्हणते की, “मी जिममध्ये वर्कआऊट करताना घसरले होते. त्यावेळी माझ्या पायाला इजा झाली. जो माझा मित्र जिममध्ये माझ्या सोबत वर्कआऊट करत होता त्यानेच मला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. यानंतर ऑर्थोपेडिक सर्जनने मला मात्र काही आठवडे आराम करण्यासाठी सांगितलं आहे. डॉक्टरांनी मला सांगितले आहे की, जर मी पायावर काही दबाव टाकला तर मला आयुष्यभर लंगडी म्हणून जगावं लागेल.”

पुढे बोलताना समैरा म्हणते, “निर्मात्यांना सांगितले की, हा प्रोजेक्ट नाही करू शकत. मला याचे खूप दु:ख वाटत आहे, मला तेनाली रामा शोमध्ये काम करता येणार नाही. तेनाली रामा शोने आपले 500 एपिसोड पूर्ण केले आहेत. यामुळे शोचे सर्वच कालाकार खूप खुश आहेत.

 

You might also like