‘ही’ अभिनेत्री गळ्यात अजगर घालून काढत होती PHOTO आणि झाले ‘असे’ काही…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनेकदा स्टार्स आपला सिनेमा हिट करण्यासाठी किंवा सीरीयलचा टीआरपी वाढवण्यासाठी काय काय करत असतात. अनेक कलाकार असे आहेत जे आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळ्या जोखीम घेत असतात. यातून अनेक दुर्घटनाही समोर येतात. नुकताच दिगंगना सुर्यवंशी सोबत असेच काही करताना दुर्घटना घडली आहे. सध्या ती तिचा आगामी सिनेमा हिप्पीचे श्रीलंकेत शुटींग करत आहे.

https://www.instagram.com/p/ByUGMBuFr8A/

 

जर तुम्ही कधी श्रीलंकेत गेलात तर तुम्हाला टोपलीत साप, अजगर घेऊन जाणारे खूप जण भेटतील. अशातच एक व्यक्ती अजगर घेऊन हिप्पीच्या सेटवर आला होता. दिगंगनाने त्या अजगरासोबत फोटो काढण्यासाठी त्याला गळ्यात घातले. त्यानंतर तिने फोटोही काढले.

Digangana-Suryavanshi-srila

त्यानंतर त्या अजगराने तिचा गळा आवळायाला सुरुवात केली. हजरजबाबीपणा दाखवत दिगंगनाने वेळीच तो अजगर गळ्यातून बाहेर काढला. त्यामुळे अजगराचा डाव फसला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

लवकरच दिगंगना हिप्पी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने आजपर्यंत अनेक मालिकेत काम केले आहे. वीरा या मालिकेतून तिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली आहे. तिच्या आगामी सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पहात आहेत. तिच्या इंस्टावर तिने या सिनेमाचे पोस्टर शेअर केले होते.