स्वप्निल जोशीसोबत ‘राधा’ची भूमिका साकारणारी ‘ही’ अभिनेत्री झाली 45 वर्षांची ! दिसते पूर्वीपेक्षा जास्त सुंदर

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सध्या दूरदर्शनवरील अनेक मालिका रिपीट टेलीकास्ट होताना दिसत आहेत. सध्या श्री कृष्णा ही मालिका खूप चर्चेत असून टीआरपीच्या बाबतीतही टॉपवर आहे. या मालिकेत तरूण कृष्णा स्वप्निल जोशीनं साकारला होता तर श्वेता रस्तोगी चौधरी हिनं राधाची भूमिका साकारली होती. सध्या मालिका आणि त्यातील पात्राचंची खूप चर्चा होत आहे.

स्वप्नील जोशी आणि श्वेता चाहत्यांमध्येही खूप फेमस आहे. सध्या श्वेताचं वय 45 आहे. आता तर ती आधीपेक्षा जास्त सुंदर दिसते. या मालिकेनंतर स्वप्निलनं खूप नाव कमावलं परंतु श्वेता यानंतर जास्त नाव कमवू शकली नाही.

अलीकडेच चाहत्यांच्या आग्रहाखातर त्यांनी दोघांनी इंस्टावर लाईव चॅट केलं. यावेळी त्यांनी खूप गप्पा मारल्या. श्वेता आधीपेक्षा जास्त सुंदर आहे. अनेक चाहत्यांनीही असंच म्हटलं आहे.

श्वेताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर श्री कृष्णा मालिकेत काम करण्याआधी तिनं खून भरी मांग या हिंदी सिनेमात काम केलं होतं. तिनं यात रेखाच्या मुलीची भूमिका साकारली होती. तिनं परिंदा, किशन कन्हैया अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. याशिवाय तिनं हिंदी मालिकेतही काम केलं आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like