‘तारक मेहता…’मध्ये अभिनेत्री आमी त्रिवेदी साकारणार ‘ही’ भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका चर्चेत आहे. यातील दयाबेन हे फेमस कॅरेक्टर करणारी अभिनेत्री दिशा वकानी हिने या मालिकेतून एक्झिट घेतली. त्यानंतर या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु झाला. अनेक चर्चाही या भूमिकेला घेऊन होताना दिसल्या. आता या सर्व चर्चांना फुलस्टॉप लागला आहे. या भूमिकेसाठी आता अभिनेत्री आमी त्रिवेदी हिला विचारण्यात आलं आहे अशी चर्चा रंगताना दिसत आहे.

परंतु याबाबत जेव्हा आमीला विचारण्यात आलं तेव्हा तिने दयाबेनच्या भूमिकेसाठी तिला काहीही विचारण्यात आलं नाही असे तिने स्पष्ट केल्याचे समजत आहे. दुसरीकडे निर्माते मात्र आमीला दिशा वकानीच्या जागेवर घेणार आहे अशी चर्चा होताना दिसत आहे. इतकेच नाही तर दयाबेनची भूमिका साकारण्यासाठी आमीचे मित्रमंडळीही तिला आग्रह करत आहेत. परंतु निर्मात्यांकडून मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

दिशा वकानीच्या एक्झिटनंतर गेल्या अनेक दिवसांपासून या मालिकेचे निर्माते असित मोदी हे दयाबेनसाठी अभिनेत्रीच्या शोधात आहे. याबाबत बोलताना असित मोदी म्हणतात की, “मला दयाबेनच्या भूमिकेसाठी शोधकार्य सुरु करावे लागणार आहे. कोणताही कार्यक्रम हा कलाकारापेक्षा मोठा नसतो. तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका आता दिशा वकानीशिवाय पुढे मार्गक्रमण करेल.”

दरम्यान दयाबेन हे पात्र नेमकं कोण साकारणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मालिकेचे चाहते नव्या दयाबेनची वाट पाहताना दिसत आहेत.