‘या’ अभिनेत्रीचे बिकीनीतले फोटो इतके व्हायरल झाले की, एका तासात ‘एवढ्या’ लोकांनी केले लाईक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सोफी चौधरी सध्या मालदीवमध्ये एन्जॉय करत आहे. सध्या अनेक सेलिब्रिटी मालदीवमध्ये सुट्टीसाठी जात आहेत. दोन दिवसांपूर्वीच सोफीचे काही हॉट आणि सेक्सी फोटो सोशलवर व्हायरल झाले होते. त्यनंतर तिचे आणखी काही फोटो झपाट्याने व्हायरल होत आहेत. हे फोटोदेखील मालदीवमधील आहेत. निळ्या रंगाच्या बिकीनीतील फोटो सोफीने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्यात सोफी खूपच आकर्षक दिसत आहे. तिचे चाहते या फोटोंमुळे घायाळ होत आहेत.

मालदीवमधील समुद्रकिनाऱ्यावर उभा असलेला सोफीचा फोटो चाहत्यांना खूपच आवडला आहे. या सोबतच आणखीही काही लेटेस्ट फोटो सोफीने इन्स्टावर शेअर केले आहेत. सर्व फोटो हे बीचवरील आहेत. हे फोटो इतके व्हायरल होत आहेत की, एका तासात या सोफीच्या सेक्सी फोटोंना 20 हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे.

दोन दिवसांपूर्वीच तिचे असे काही बिकीनीतील हॉट फोटो सोफीने शेअर केले होते. तेही असेच व्हायरल झाले होते. सोफीच्या अनेक फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत तिच्या बोल्डनेस आणि हॉटनेसचे कौतुक केले आहे. तिच्या पाठमोऱ्या फोटोची तिच्या चाहत्यांनी विशेष स्तुती केली आहे. तिचा हा फोटो चाहत्यांना खूपच भावला आहे.