‘हा’ देश बनला जगातील पहिला तंबाखू मुक्त देश

भूतान : वृत्तसंस्था – हिमालयाच्या कुशीत वसलेल्या भूतान देशाने जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. भूतानने देशामध्ये तंबाखूजन्या पदार्थ विक्री करण्यास मनाई केली आहे. भूतानने तंबाखू नियंत्रण कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान किंवा तंबाखू विक्री बेकायदेशीर केले आहे. त्यामुळे भूतान हा जगातील पहिला तंबाखू मुक्त देश बनला आहे.

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या देशात सहाव्या शतकामध्ये तंबाखूजन्य पदार्थावर बंदी घालण्यात आली होती. या ठिकाणच्या काही लोकांचे म्हणणे आहे की, ही परंपरा जुनी आहे. आधुनिक भूतानचे संस्थापक नवांग नाम्ग्याल यांनी सार्वजनीक ठिकाणी धुम्रपान करण्यावर पहिल्यांदा बंदी घातली होती. तसेच शासकीय कार्य़ालयात देखील धुम्रपान करण्यास बंदी  घालण्यात आली होती.

भूतानच्या आरोग्यचा देखील तंबाखू बंदीच्या परंपरेवर विश्वास आहे. आरोग्य खात्याच्या म्हणण्यानुसार, भूतानमध्ये बैद्ध धर्माचे महान संत रिम्पोछे यांनी देखील धुम्रपान करणे हे योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच कोणत्याही बुद्ध अनुयायाने धुम्रपान करू नये असे म्हटले होते.  त्यांच्या या उपदेशानुसार भूतान देशामध्ये तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे.