जगात कोणाला डेट करायचे असेल तर मी ‘या’ नेत्याला डेट करेल’ : करीना कपूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील क्रिकेटर, पॉलिटीशन आणि बॉलिवूड सितारे नेहमीच चर्चेत असतात. चाहत्यांना आपल्या आवडच्या स्टारबद्दल जाणून घेण्याची नेहमीच इच्छा असते. सध्या करीना कपूरचा एक व्हिडीओ सोशलवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. त्यात जगात जर कोणाला डेट करण्याची संधी मिळाली तर कोणाला डेट करणार याचा खुलासा केला आहे. एका राजकीय नेत्याला ती डेट करु इच्छित आहे असे तिने सांगितले आहे. एका मुलाखतीत बोलत असताना करीनाने ही बाब स्पष्ट केली आहे.

एका मुलाखतीत बोलताना करीनाला विचारण्यात आलं की, जगात जर तुला कोणाला डेट करण्याची संधी मिळाली तर तू कोणाला डेट करशील. यावेळी बोलताना करीना म्हणाली की, “मला राहुल गांधींना डेट करायला आवडेल. मी नेहमीच याबाबत विचार करत असते की, जेव्हा मी आणि राहुल डेटवर जाऊ तेव्हा आमच्यात दोघांत नेमकं काय बोलणं होईल. कारण आमचं क्षेत्र एकदमच वेगळं आहे.” असा खुलासा करीनाने केला आहे.

दरम्यान करीनाचा हा व्हिडीओ जुना आहे. परंतु हा तिचा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. सगळीकडे तिच्या या व्हिडीओची चर्चा होताना दिसत आहे. या व्हिडीओच्या निमित्ताने करीना कपूर पुन्हा चर्चेत आली आहे.