‘या’ मंत्र्यामुळे माझा भाजप प्रवेश रखडला

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – नारायण राणे यांनी आत्मचरित्र लिहणार असे जाहीर केला तेंव्हापासूनच त्याची चर्चा रंगू लागली होती. आत्मचरित्र पूर्ण झाल्यानंतर आता त्यातून रोज नवीन नवीन खळबळजनक आरोप समोर येत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याविषयी गौप्यस्फोट केल्यानंतर आता त्यांनी भाजपमधील क्रमांक दोनच्या मंत्र्यावर निशाणा साधला आहे.

आत्मचरित्रात त्यांनी लिहिले आहे कि, चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाचे मला आमंत्रण दिले होते. तेव्हा त्या लग्नात मुख्यमंत्र्यांची आणि माझी भेट झाली आणि या भेटीत त्यांनी मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती. यादरम्यान मला पक्षात घेतल्यास पाठिंबा काढून घेण्याची धमकी शिवसेनेने दिली होती. त्यामुळे माझा पक्षप्रवेश रखडला. मुखमंत्र्यांनी मला योग्य ते पद आणि मान देण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र नंबर दोनच्या नेत्यांच्या पोटात दुखायला लागले आणि पक्षाच्या भल्यासाठी भाजपात प्रवेश करा असे बोलणाऱ्या नेत्यांना माझा विसर पडला असे त्यांनी चंद्रकांत पाटलांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. माझा पक्ष प्रवेश झाल्यावर त्यांची महत्वाची खाती माझ्याकडे येतील या भीतीमुळे त्यांनी माझा पक्षप्रवेश रोखला.दरम्यान आता यावर भाजपमधून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .