बॉलिवूडच्या ‘या’ 4 टॉपच्या अभिनेत्रींनी खाल्‍लाय नवर्‍याचा ‘मार’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपण म्हणतो सामान्य कुटुंबात अत्याचार होतात. पण बॉलिवुडमध्येही हे अत्याचार होत असतात. ज्या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने लाखोंच्या मनावर राज्य केले. त्यांना आपल्या नवऱ्याचा मार खावा लागला आहे. अशाच काही अभिनेत्रींची माहिती आहे.

मीना कुमारी

बॉलिवुडमध्ये सर्वात भयवह अत्याचार हे अभिनेत्री मीना कुमारी यांच्यावर झाले आहेत. भारतीय चित्रपट क्षेत्रात त्यांनी त्यांच्या अदांनी सर्वांना घायाळ केले होते. भारतात त्यांचे लाखोंवर चाहते होते. मात्र त्यांचे आयुष्य फक्त त्यांच्या नवऱ्यामुळे नरक बनले होते. त्यांचे पती कमाल अमरोही हे त्यांचे मित्र आणि मीना यांच्यावर देखरेखीसाठी ठेवलेले माणसं तीला मारायचे. शुटींगवेळी त्यांच्यासोबत दोन लोकांना नेहमी ठेवण्यात आले होते. त्यांच्या ड्रेसिंगरुमध्ये एखादा पुरुष गेल्याचे दिसले. तर त्या पुरुषाआधी हे दोन माणसे मीना कुमारी यांना मारहाण करायचे.
Image result for मीना कुमारी

श्वेता तिवारी

श्वेता तिवारी हे टेलिव्हीजनवर गाजलेले नाव आहे. श्वेता या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमुळे घराघऱात पोहचल्या होत्या. त्यांच्यावरही घरगुती हिंसा झालेली आहे. त्या दिवसभर मालिकेची शुटींग करायच्या आणि घरी गेल्यावर त्यांचे पती राजा चौधरी त्यांना मारहाण करत असे. या जाचाला कंटाळून त्यांनी राजा चौधरी यांच्याशी काडीमोड घेत, स्वतःची सुटका करून घेतली.
shweta-tiwari

युक्ता मुखी

मिस वर्ल्ड राहिलेली अभिनेत्री युक्ता मुखी हीनेही अधिक आपल्या पतीचे अधिक टॉर्चर सहन केले आहे. युक्ताला तिच्या नवऱ्याकडून हुंड्यासाठी मारहान होत होती. तसच तिला अप्राकृतिक संबंध बनवण्यासाठी त्रास दिला जायचा. त्यावर तिने न्यायालयात दाद मागत आपल्यावरील हे संकट दूर केले होते.
Image result for युक्ता मुखी

गीता दत्त

गुरु दत्त यांची पहिली पत्नी गीता दत्त यांनीही आपला मानसिक छळ केल्याचे सांगितले होते. पहिली पत्नी असताना गुरु दत्त यांच्या आयुष्यात वहिदा रहमान यांची एन्ट्री झाली होती. गीता दत्त यांना या नात्याचा तिटकारा होता. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत. त्यामुळे या सर्वाला कंटाळून त्यांनी घर सोडले होते.
Image result for गीता दत्त

आरोग्यविषयक वृत्त