‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीनं ‘हॉट’ सीनसाठी डायरेक्ट ‘टॉप’च काढला, पाहून अभिनेता झाला भलताच ‘गरम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलिवूड अभिनेता राजीव खंडेलवालने आपल्या ‘फीवर’ चित्रपटात तीन अभिनेत्रींसोबत काम केले. ज्यामध्ये केटेरिना मुरिनो, जेम्मा एटकिंसन आणि गौहर खान दिसून आले होते. चित्रपटात बरेच बोल्ड सीन आहेत. ज्यामुळे चित्रपटाचे स्टारकास्ट खूपच चर्चेत आले होते. या चित्रपटात राजीव आणि जेम्मा एटकिंसन यांच्यात खूपच हॉट लव्ह मेकिंग सीन होते.

पण आता चित्रपटाशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. ज्यात राजीव आणि जेम्माच्या लव्हमेकिंग सीनदरम्यान असे काही घडले की सेटवर उपस्थित सर्वांनाच धक्का बसला. या हॉट सीनमध्ये जेम्माला टॉप काढायचा होता. हा सीन शूट करण्यासाठी राजीव व्यतिरिक्त इतर लोक सेटवर उपस्थित होते. बॉलिवूडच्या वृत्तानुसार, जेव्हा जेम्माने टॉप काढला तेव्हा समोरचे दृश्य पाहून राजीव आश्चर्यचकीत झाला. राजीवसोबत सेटवर उपस्थित सर्वांना आश्चर्य वाटले.

जेव्हा जेम्माने टॉप काढला तेव्हा राजीव आणि सर्व लोकांना असे वाटले की, तिने आत काहीही घातलेले नाही. पण नंतर जेम्माने स्वतः सांगितले केले की तिने चिकन फिलेट नावाचे एक कव्हर परिधान केले होते, त्यास नग्न ब्रा देखील म्हटले जाते. त्यानंतर सीन शूट करण्यात आला.

You might also like