‘आयइनस्टाईन’ पेक्षाही ‘जास्त’ चालतं ‘या’ मुलाचं ‘डोकं’, 9 व्या वर्षातच मिळवली ‘ग्रॅज्युएट’ची ‘पदवी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेदरलँडची राजधानी असलेल्या एम्स्टडॅममधील एका नऊ वर्षाच्या लॉरेंट सिमंसची बुद्धी आइनस्टाईन पेक्षाही फास्ट आहे. येत्या डिसेंबर महिन्यात तो आपले ग्रँज्युएशनची डिग्री पूर्ण करणार आहे. लॉरेंट एवढा हुशार आहे की केवळ नऊ महिन्यात त्याने आपली सर्व अभ्यास पूर्ण केला आहे. लॉरेंट इलेकट्रोनिक इंजिनिअरिंग करत आहे.

लॉरेंटचा आईक्यू स्तर 145 इतका आहे, लॉरेंटची बुद्धिमत्ता पाहून जगातील सगळ्यात मोठी युनिव्हरसिटी त्याला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी बोलवत आहे. परंतु लॉरेंटला अंतराळवीर किंवा हार्ड सर्जन व्हायचे आहे. लॉरेंटने एका वर्षाचा असतानाच हायस्कुलची परीक्षा पास केली होती. तसेच लॉरेंटने सांगितले की, पुढील अभ्यासासाठी त्याला कॅलिफोर्नियाला जायचे आहे. परंतु त्याचे आई वडील त्याला युकेमध्ये शिकवू इच्छितात.

लॉरेंटच्या वडिलांच्या मते ऑक्सफोर्ड आणि कैम्ब्रिज युनिव्हरसिटीमध्ये अभ्यास करणे सोयीस्कर असेल त्यांनी सांगितले की लॉरेंटल रोबोटिक्स मध्ये पीएचडी करायची आहे त्यामुळे त्याने ब्रिटनमध्येच आपले शिक्षण पूर्ण करावे असे ते सांगतात.

आजी आजोबांसाठी बनायचे आहे हार्ट सर्जन
बेल्जियममध्ये जन्मलेल्या लॉरेन्ट सिमन्सच्या बुद्धीची तुलना अल्बर्ट आइन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंगशी केली जाते. लॉरेन्टला चार भाषांचे ज्ञान आहे. लॉरेन्टची आई लिडिया म्हणाली की त्यांच्या आजी – आजोबांनी क्षमता ओळखली आणि पुढील शिक्षणास मदत केली. लॉरेंट त्याच्या आजी आजोबांवर खूप प्रेम करतो. म्हणूनच लॉरेन्टचे आजी – आजोबा हार्ट पेशंट असल्याने तो हार्ट सर्जन बनू इच्छित आहेत.

Visit : Policenama.com