झोप येत नसेल तर खा हे खास प्रकारचे चॉकलेट, इम्युनिटी बूस्टर सुद्धा, वाढवते एनर्जी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आता एक असे चॉकलेट लाँच झाले आहे जे केवळ स्ट्रेस कमी करणे, इम्युनिटी वाढवणे, एनर्जी वाढवणे आणि झोप येण्यासाठी उपयोगी असल्याचे सांगितले जात आहे. एप्रिल महिन्यात लाँच झालेले AWSUM नावाचे हे चॉकलेट आयुर्वेदाने प्रभावित फंक्शनल चॉकलेट असल्याचे सांगितले जात आहे.

अवॅज्म चॉकलेट कंपनीचे सीईओ प्रणव यांनी म्हटले की, आयुर्वेदमध्ये अगोदरच अशा काही वनस्पती आहेत, ज्या वेगवेगळ्या शारीरीक समस्यांसाठी सूचवल्या जातात. याच आधारावर चॉकलेटचे 4 व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये स्लीपिंग डिसऑर्डर, इम्युनिटी बूस्टर, स्ट्रेस रिलीव्हर आणि एनर्जीसाठी खास प्रकारच्या चॉकलेटचा समावेश आहे. हे तरूणांना लक्षात घेऊन बनवले आहे.

अनेक गंभीर आजारांच्या मुख्य कारणांमध्ये स्ट्रेस प्रमुख मानला जातो. तणावापासून दूर राहण्यासाठी हे चॉकलेट खुप उपयोगी ठरू शकते. यामध्ये स्ट्रेस कमी करण्याचे विशेष गुण आढळले आहेत.

इम्युनिटी चॉकलेट मुलांना सुद्धा खाऊ घालता येऊ शकते. यामध्ये वेगवेगळ्या प्रॉडक्टनुसार साहित्य आहे. इम्युनिटीसाठी बनवलेल्या चॉकलेटमध्ये अश्वगंधा, आवळा, हळद, गुळवेल आणि आले यासारख्या वस्तू वापरल्या आहेत. हे चॉकलेट फूड स्टँडर्डवर यशस्वी ठरले आहे आणि यास फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे एफएसएसएआयद्वारे लायसन्स प्राप्त आहे. अपेक्षा आहे की आगामी काळात याची मागणी वाढेल.