या शहरात सलग दोन महिने असतो अंधार का ? वाचुन व्हाल हैराण 

वृत्तसंस्था : पोलीसनामा ऑनलाईन – जगात खूप आश्चर्यकारक ठिकाणं आहेत जिथे काही काही अजीब घडत असत. असेच काही या शहरात होते. रशिया मधील एक शहर आह ज्या शहरात दोन महिने अंधार असतो. याचे कारणही खुप भयानक आहे, त्याला ऐकुण तुमचा थरकाप उडेल.
रशियातील या शहराचे नाव आहे नोरिल्स्क, ते रशियातील सायबेरियामध्ये आहे. या शहराला जगातील सगळ्यात थंड शहर मानले जाते. मिडिया रिपोर्ट्सनुसार, थंडीच्या दिवसांत येथील कमाल तापमान -61 डिग्री सेल्सियसपर्यंत कमी होते, तर येथील रेगुलर तापमान 10 डिग्री सेल्सियस असते.

नोरिल्स्कमध्ये पडणाऱ्या थंडीचा अंदाज तुम्ही यावरून लावु शकता, याठिकाणी 9 महिने बर्फ साचलेला असतो. येथील लोकांना दर तिसऱ्या दिवशी बर्फाच्या वादळाचा सामना करावा लागतो.

येथील लोक 2 महिने (डिसेंबर-जानेवारी) मध्ये सुर्याला पाहू शकत नाहीत, कारण येथे रोज बर्फ पडत असतो . आणि त्यामुळे दिवस-रात्र अंधारच असतो. नोरिल्स्कला रशियातील सगळ्यात श्रीमंत शहर माणले जाते.
रशियाची राजधानी मॉस्कोपासून नॉरिल्स्क हे शहर सुमारे 2900 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. आर्क्टिक वृत्तापासून शहर 300 किलोमीटर अंतरावर आहे. या शहरात पोहोचण्यासाठी रस्तेमार्ग उपलब्ध नाही. येथे केवळ विमान किंवा नौकेच्या माध्यमातून पोहोचता येते. हे शहर रशियापासून अत्यंत दूरवर असल्याने लोक देखील उर्वरित देशाला मुख्यभूमी असे संबोधितात.
खनिजांचा मोठा साठा
नॉरिल्स्क भले अन्य देशांपासून दूर अंतरावर असले तरीही येथे सार्वजनिक वाहतूक सेवा, कॅफे, चर्च, बार, कलादालने आणि चित्रपटगृहांसमवेत आधुनिक काळातील सर्व सुविधा उपलब्ध आहेत. नॉरिल्स्कमध्ये जगातील सर्वात मोठा निकेल, प्लॅटिनम आणि पॅलेडियमचा साठा असल्याने हे रशियातील सर्वात श्रीमंत शहर आहे. 28 ग्रॅम पॅलेडियमचे मूल्य एक हजार डॉलर्स असल्याने येथील लोक प्रचंड श्रीमंत आहेत. खनिजांचे उत्खनन आणि ते स्वच्छ करण्यासाठी येथे नॉरिल्स्क निकल ही कंपनी कार्यरत आहे. पूर्ण रशियाच्या जीडीपीत याची हिस्सेदारी 2 टक्के इतकी आहे.
सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक
 मोठय़ा प्रमाणावर खाणकाम तसेच शुद्धीकरण प्रकल्पांमुळे नॉरिल्सला जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक मानले जाते. नॅशनल जियोग्राफिकनुसार हवेत सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण अधिक असल्याने सुमारे 30 किलोमीटरच्या कक्षेतील वृक्षसंपदाच नष्ट झाली आहे. अत्याधिक विषारी घटकांचा फैलाव झाल्याने बेरी किंवा मशरूम तोडू नका अशी ताकीद लोकांना देण्यात आली आहे.
स्थिती भयावह
खननकार्यामुळे दाल्दीकन नदीचे पाणी लाल झाले आहे. नॉरिल्स्क एक वर्षात पूर्ण फ्रान्सइतके सल्फर डायऑक्साईडचे उत्सर्जन करते. या शहरावर ‘माय डेडली ब्युटीफूल सिटी’ हा माहितीपट तयार करणाऱया व्हिक्टोरिया फायोरने तेथील स्थिती विशद केली आहे. लोक कंपनीबद्दल काहीही बोलण्यास घाबरतात. या लोकांची जीवन या कंपनीच्या यशावरच चालले असल्याचे ती सांगते.