‘कोरोना’च्या संकटात टर्मिनेट केल्या जाणार्‍या कर्मचार्‍यांना 7 महिन्याची सॅलरी देतीय ‘ही’ कंपनी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटामुळे भारतासह जगभरातील उद्योगांच्या हालचाली ठप्प झाल्या आहेत. यामुळे मोठ-मोठ्या कंपन्यांची आर्थिक स्थिती खराब झाली. उद्योग सुरू ठेवण्यासाठी अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात आणि सॅलरी कपात सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर ग्लोबल आयटी कंपनी एसेंचर सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करत आहे. कंपनी अशा कर्मचार्‍यांना सात महिन्याचा पगार देत आहे. मात्र, ही सुविधा त्याच कर्मचार्‍यांना दिली जात आहे, जे स्वेच्छेने राजीमाना देत आहेत.

बहुतांश कंपन्या कर्मचार्‍यांना कमी करताना दोन किंवा तीन महिन्यांचा पगार देत आहेत. तर आयटी कंपनी एसेंचर स्वेच्छेने राजीनामा देणार्‍या कर्मचार्‍यांना महिन्याचे वेतन देत आहे. जर कुणी कर्मचार्‍याने स्वेच्छेने नोकरी सोडली तर त्यास एक, दोन किंवा तीन महिन्याची नोटीस द्यावी लागते. नोटीस पीरियडच्या दरम्यान तो ऑफिसमध्ये काम करतो आणि त्यास पूर्ण वेतन मिळते. एसेंचरच्या प्रकरणात कर्मचारी ज्या दिवशी नोटीस देईल त्यानंतर त्यास सात महिन्यांचे वेतन जाईल. मात्र, यामध्ये एक अट आहे, कर्मचार्‍याला या सात महिन्यांचे वेतन एकदाच मिळणार नाही, हे वेतन सात महिन्यापर्यंत मिळत राहिल.

कर्मचार्‍यांची यादी तयार
कोरोना संकटात एसेंजर जगभरातील आपल्या कर्मचार्‍यांपैकी पाच टक्के कर्मचार्‍यांची कपात करणार आहे. भारतात एसेंचरचे दोन लाख कर्मचारी आहेत. म्हणजे सुमारे 10,000 कर्मचार्‍यांची नोकरी जाणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले की, आम्ही सर्वात कमजोर कमगिरी असलेल्या कर्मचार्‍यांची यादी तयार करत आहोत. त्याच आधारावर कपात केली जाईल.