‘या’ निर्णयामुळे भारतातील सर्व आयफोन बंद होणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अॅपल आणि ट्राय यांच्यात डीएनडी अॅपवरुन खडाजंगी सुरु असून स्पॅम कॉलच्या रिपोर्टसाठी अॅपलने डीएनडी अॅप इन्स्टॉल करावे अशी ट्रायने मागणी केली आहे. मात्र आपल्या युजर्सच्या गोपनियतेचा मुद्दा पुढे करुन अॅपलने ट्रायची मागणी मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ट्राय आणि अॅपलच्या भांडणात अॅपलचे फोन बंद होतील की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’793e9220-8db9-11e8-8772-45e47ef36ff3′][amazon_link asins=’B00QWV6MTE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’844dd728-8db9-11e8-ba30-4903860a354b’]

ट्रायने 19 जुलैपासून लागू केलेल्या नव्या नियमानुसार, सर्व मोबाईल फोनमध्ये डीएनडी अॅप इन्स्टॉल असावं ज्यामुळे फ़ेक कॉल्स आणि स्पॅम मेसेज रिपोर्ट करण्याची परवानगी युजरला मिळू शकेल. ट्रायने नियमाचं पालक करण्यासाठी मोबाईल कंपन्यांना सहा महिन्याची मुदत दिली आहे.ट्रायने 2017मध्ये फेक कॉल्स आणि स्पॅम मेसेजचा त्रास मोबाईल वापरकर्त्यांना होऊ नये यासाठी या अॅपची निर्मिती केली आहे. हे अॅप सध्या अॅन्ड्रॉईडच्या प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. मात्र अॅपलने आपल्या आय स्टोअरमध्ये या अॅपला जागा दिली नाही. अॅपलने आपल्या आय स्टोअरमध्ये या अॅपला जागा दिली नाही तर, कंपनीला भारतीय बाजारपेठेला मुकावं लागेल, असं ट्रायने ठणकावलं आहे.
[amazon_link asins=’B005FYNT3G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8b8f990d-8db9-11e8-bd22-493031f09910′]अॅपलने कधीही थर्ड पार्टी अॅप्सना आपल्या युजरचे कॉल आणि मेसेज वाचण्याची परवानगी दिलेली नाही. अॅपलचं म्हणणं आहे की, डीएनडी अॅप युजर्सचे कॉल आणि मेसेज रेकॉर्ड करण्याची परवानगी मागतो. त्यामुळे युजरची गोपनियता धोक्यात येऊ शकते. आता डीएनडी अपच्या या भांडणात कोण नमतं घेईल, हे पाहावं लागेल.