‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं चक्क ‘ब्रा’पासून MASK बनवायला शिकवलं ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :कॉमेडियनं चेल्सी हँडलर हिनं तिच्याच ब्रापासून मास्क तयार केला आहे. फीमेल फर्स्ट डॉट को डॉट युकेच्या रिपोर्टनुसार, आपल्या इंस्टावरून चेल्सीनं चाहत्यांना कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान क्रिएटीव राहण्यासाठी अपील केलं आहे. सोबतच तिनं हे ही सांगितलं आहे की, एका ब्रापासून मास्क कसं तयार करावं.

चेल्सीनं तिच्या इंस्टावरू एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती ब्रापासून मास्क कसं तयार करायचं हे सांगताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना चेल्सी म्हणते, “शॉर्ट सप्लायमध्ये तयार करण्यात आलेलं मास्क. आपल्याला आता प्रकरण आपल्या हातात घ्यावं लागेल. पुरुषांनाही.” व्हिडीओत दिसत आहे की, चेल्सी एका ब्राला मास्कमध्ये रुपांतर करत चेहऱ्यावर लावत आहे. चेल्सीच्या या आयडियाचा मारिया श्रीवरवर खूप प्रभाव पडला. तिनं कमेंट केली की, मी तुम्हाला असं बाहेर जाण्यासाठी आव्हान देते. कदाचित तुम्ही असं करालही.

चेल्सीचा हा ब्रापासून मास्क तयार केल्यााच व्हिडीओ सोशलवर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

अमेरिकेत अजूनही कोरोनाचा कहर सुरूच आहे. अमेरिकेत सलग दुसऱ्या दिवशी 2000 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 14695 लोक दगावले आहेत. बुधवारी 1973 आणि मंगळवारी 1939 लोकांचा मृत्यू झाला आहे.