फक्त 20 पैसे खर्चात एक किलोमीटर धावणार ‘ही’ स्कूटर, विना लायसन्स आणि रजिस्ट्रेशनने संपूर्ण शहरात करा प्रवास

नवी दिल्ली : वृत्त संस्था – इलेक्ट्रिक स्कूटर्सची वाढती मागणी पहाता अनेक कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच करत आहेत, ज्यामध्ये आश्चर्यकारक फिचर्स देण्यात आले आहेत. परंतु आम्ही अशा स्कूटरबाबत सांगणार आहोत, जी अतिशय आश्चर्यकारक आहे आणि हिच्याद्वारे तुम्ही अवघ्या 20 पैसे खर्चात 1 किलोमीटराचा प्रवास करू शकता. ही इलेक्ट्रिक स्कूटर मागील महिन्यात 18 तारखेला लाँच करण्यात आली होती जिचे नाव ‘कजझए’ आहे.

‘होप’ इलेक्ट्रिक स्कूटर 25 किलोमीटर प्रति तासांचा टॉप स्पीड देते आणि ती चालवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रजिस्ट्रेशनची सुद्धा आवश्यकता नाही. यासोबतच स्कूटरच्या खरेदीवर इलेक्ट्रिक व्हेईकलवर मिळणारी सूट सुद्धा मिळू शकते.

ही आहेत ‘होप’ ची वैशिष्ट्ये

* बॅटरी मॅनेजमेंट सिस्टमसह ही स्कूटर येते, किती टक्के बॅटरी शिल्लक आहे, तसेच बॅटरी हेल्थ विषयी माहिती मिळते. यूजर सहजपणे अ‍ॅपमध्ये लॉगिन करून बॅटरी चार्ज, स्पीड, व्होल्टेज, जीपीएस लोकेशन आणि व्हेईकलच्या ट्रिपबाबत माहित मिळवू शकतो.

* या स्कूटरची बॅटरी 4 तासात फुल चार्ज होते. 3.10 तासात बॅटरी 80 टक्केपर्यंत चार्ज करू शकता. एकदा चार्ज केल्यावर 75 किलोमीटरचा प्रवास करू शकता.

* गेलियोस मोबिलिटी कंपनीने या स्कूटरमध्ये पेडल असिस्ट फिचर दिले आहे. पार्किंगसाठी रिव्हर्स मोड टेक्नोलॉजी दिली आहे.

* ही लाईट वेट आणि स्ट्राँग फ्रेमने बनवली आहे. हेवी ट्रॅफिकमधून सहज बाहेर पडण्याची क्षमता आहे. यूजर गरजेनुसार भार वाहक अ‍ॅक्सेसरीज किंवा मागील सीट जोडू शकतात. या स्कूटरची किंमत 46,999 रुपये आहे.