‘हा’ भारतीय चित्रपट चीनमध्ये सुपर हिट ; शाजाम या हॉलिवूडपटालाही टाकले मागे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतात प्रचंड लोकप्रिय ठरलेला बॉलिवूडचा एक चित्रपट नुकताच चीनमध्ये प्रदर्शित झाला आहे. दरम्यान या चित्रपटाने चीनमध्येदेखील लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचे नाव आहे अंधाधुन. भारतात तर हा चित्रपट चांगला गांजलाच परंतु चीनमध्येही आता त्याने बाजी मारली आहे. अंधाधुनने शाजाम या हॉलिवूडपटालाही मागे टाकल्याचे दिसत आहे.

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. शाजाम या हॉलिवूडपटाला मागे टाकत चीनमध्ये अंधाधुन सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या ट्विटमध्ये तरण आदर्श म्हणतात की, “अंधाधुन चित्रपट चीनमध्येही गाजताना दिसत आहे. तेथील तिकीट काऊंटवर सध्या अंधाधुन राज्य करत आहे. शाजाम या हॉलिवूडपटाला मागे टाकत अंधाधुनने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. आणि हे खरंच खूपच कौतुकास्पद आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.

२०१८ मधील अंधाधुन हा भारतात सर्वात लोकप्रिय ठरलेला चित्रपट आहे. श्रीराम राघवन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आयुष्मान खुराणा, राधिका आपटे आणि तब्बू हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. अंधाधुन हा चित्रपट मर्डर मिस्ट्रीवर आधारीत असून प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडला होता. सध्या हा चित्रपट चीनमध्येही गाजताना दिसत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने एकूण ११५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.