नको ‘त्या’ कॉल्स अन् SMS मुळं आलाय वैताग? ‘या’ पध्दतीनं करा DND मोड अ‍ॅक्टीव्ह, कमी होईल ‘कटकट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जाहिरात कंपन्यांकडून येणाऱ्या सततच्या नको असलेल्या फोन आणि SMS मुळे त्रस्त झाला आहात का? मग आता काळजी करु नका. यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना DND मोड अ‍ॅक्टिव्हेट करण्याची सुविधा दिली आहे. डू नॉट डिस्डर्ब अर्थात DND सर्विस अ‍ॅक्टिव्हेट केल्यानंतर मार्केटिंग कॉल्स येणे बंद होणार आहे. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स वापरून ही सेवा सुरु करता येईल. पाहूयात काय आहेत या सोप्या टिप्स.

Vodafone-Idea युजर्स कसा अ‍ॅक्टिव्हेट कराल DND मोड
1)वोडाफोन-आयडियाची DND सर्विस सुरू करण्यासाठी https://www.myvi.in/dnd या लिंकवर जावे लागेल.
2) त्यानंतर वोडाफोन-आयडिया युजर्स त्यांचा नंबर टाईप करुन Get OTP वर क्लिक करा.
3) ओटीपी टाकल्यानंतर DND सेटिंग्स येईल.
4) त्यानंतर DND मोड अ‍ॅक्टिव्हेट किंवा डी-अ‍ॅक्टिव्हेट करता येईल.

Reliance Jio युजर्स –
1) फोनमध्ये MyJio अ‍ॅप डाउनलोड करुन लॉगइन करा.
2) त्यानंतर आता Settings मध्ये जा.
3) येथे DND हा पर्याय दिसेल.
4) त्यानंतर कंपनी एक लेटर देईल आणि DND मोड 7 दिवसांमध्ये अ‍ॅक्टिव्हेट होईल.

Airtel युजर्स –
1) यासाठी एअरटेल वेबसाईट www.airtel.in वर जाऊन DND पेजवर जा किंवा थेट https://www.airtel.in/airtel-dnd/ या लिंकवरही जाऊ शकता.
2) एअरटेल मोबाईल सर्विस सेक्शनमध्ये Click Here ऑप्शनवर क्लिक करा.
3) तुमचा एअरटेल नंबर टाका आणि Get OTP वर क्लिक करा.
4) OTP टाकल्यानंतर end all ऑप्शनवर क्लिक करा.