हे सरकारच नाही तर यांचा विधानसभा अध्यक्ष ही बहिरा आहे : अब्दुल सत्तार

पैठण : पोलीसनामा ऑनलाईन – पैठण तालुक्यातील दुष्काळ सभेत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी भरसभेत हरिभाऊ बागडेंवर वैयक्तिक टीका केली. इतक्या वाईट शब्दात बागडेंवर टीका करणारे सत्तार हे पहिलेच नेते आहे. सत्तार म्हणाले हे सरकारच नव्हे तर सरकारचा अध्यक्षही बहिरा असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. छत्रपती शिवाजी महारांच्या स्मारकाची उंची कमी करण्याचं कारण विचारल्यानंतर त्यांनी कमी ऐकायला आल्यामुळे चुकीचे उत्तर दिले यावरून सत्तार यांनी भरसभेत त्यांच्यावर व्यंगात्मक टीका केली.

यावेळी बोलताना सत्तार म्हणाले नाना छत्रपती शिवाजी महारांच्या स्मारकाची उंची कमी करण्याचं कारण काय असं मी एकदा विधानसभेत विचारल्यानंतर, ते बहिर मला हा चांगलय मग, बसा आता असं म्हणाले. काय बहिर आहे हे असं मी म्हणालो आणि विषय सोडला अशी व्यंगात्मक टीका केली. आमचे नेते कल्याण काळे हे जर दीड हजार मतांनी पडले नसते तर आज तो बहिरा सभागृहात बसलाच नसता असेही सत्तार यावेळी म्हणाले.

लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत त्यात एका जेष्ठ माणसावर अशी टीका करणे कितपत योग्य आहे. अशी चर्चा मराठवाड्यात सुरु आहे. दरम्यान हरिभाऊ बागडे हे फुलंब्री मतदार संघातील लोकप्रिय आमदार आहे. त्यामुळे याचा मोठा फटका काँग्रेस ला बसू शकतो. या शक्यता नाकारता येणार नाही.