भारतीय सैन्याची ही केवळ एक झलक…

मुंबई : पोलीसनामा – भारतीय सैन्याच्या क्षमतेची ही केवळ एक झलक आहे. आता ट्रेलर नंतर पिक्चर कधी रिलीज करायचा ? हे सैन्याचं नेतृत्व योग्यवेळ आल्यावर ठरवेल, असे वक्तव्य करीत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज भारतीय लष्कराच्या कामगिरीचे कौतुक करत सभागृहात अभिनंदन केले. भारताच्या वायुदलाच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मिरात असलेल्या दहशतवाद्यांच्या छावणीवर घडुन आनलेल्या धाडसी कारवाई केल्याबद्दल ,आज वायुदलाच्या जवानांच्या अभिनंदनपर ठरावास माझा पुर्णपणे पाठिंबा असून,मी वायुदलाच्या जवानांच अभिनंदन करतो,असे यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

बारा दिवसा पुर्वी झालेल्या पुलवामा येथील दहशतवादी हल्यानंतर संपुर्ण भारत देश दुःखात असतांना देखील . संपुर्ण भारतीय जनता पुर्णपणे सैन्याच्या पाठीशी उभी राहिली,यात कोणत्याही पक्षाने राजकारण न करता संपुर्ण भारतीय जनता आणि सर्व राजकिय पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उबे राहिले असे देखील ते या वेळी बोलतांना म्हणाले.

आज सकाळच्या सुमारास भारतीय वायुदलाच्या सैनीकांनी बेधडक घुसून जबरदस्त हल्ला केला.या हल्ल्यात ३०० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले,आणि हल्ला करण्यासाठी वापरात आलेली सर्व लढावू विमाने सुखरुपणे वापस परतली. या हल्ल्यात लष्कर ए तोयबो,जैशे ए मोहम्मद,हिजाबुल मुझाहिद्दिन, आशा दहशतवादी संघटनांचे पार कंबरडे मोडुन टाकले,आपण सर्वजण भारताच्या सैन्यदलाच्या पाठीशी तनमनाने पुर्णपने उभे राहिले पाहिजे असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.