#YogaDay2019 : ‘अपचना’चा त्रास असणाऱ्यांसाठी ‘हे’ आसन ठरतय ‘रामबाण’ उपाय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकांच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळा बदलत असतात. सततच्या धावपळीमुळे त्यांना वेळेवर जेवण करणे तसेच म्हणावे तसे स्वत:कडे लक्ष देणे जमत नाही. यावेळी त्यांना काहीही बाहेरचं खावं लागतं किंवा खाण्याच्या वेळा नेहमीच बदलत असतात. यावेळी अनेकांना अपचन आणि इतर पोटाच्या समस्या भेडसावतात. सगळं काही वेळेवर होत असूनही काहींना अपचनाची समस्या भेडसावत असते. आज आपण यावर कोणत्या आसनाचा वापर करून या त्रासातून मुक्ती मिळवू शकतो याची माहिती घेणार आहोत.

अपचनाचा त्रास असणाऱ्यासांठी उत्तम आसन कोणते असेल तर ते म्हणजे वज्रासन आहे. हे असे आसन आहे जे तुम्ही जेवणानंतर करू शकता. याशिवाय अपचनाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला हे आसन जेवणानंतरच करायचे आहे. जेवणानंतर वज्रासनात बसल्याने तुमच्या पचनसंस्थेचे कार्य सुधारते.

कसं करायचं वज्रासन ?

ज्यांना पाचनतंत्र प्रणालीचे विकार आहेत त्यांनी जेवणानंतर वज्रासनात बसावे(दोन्ही पाय दुमडुन एकमेकांच्या जवळ घेत बसायचे आहे.) वज्रासनात बसल्यानंतर दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घेत असताना पोट पढे येईपर्यंत तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे. अशी क्रिया तुम्हाला 50 वेळा जेवणाआधी आणि  जेवणानंतर करायची आहे 

.

या आसनामुळे नेमके काय फायदे होतात ?

या आसनाचा प्रमुख फायदा असा की, तुमचे पाचनतंत्र सुधारते. हे आसन मेडिटेटीव्ह आसन आहे त्यामुळे या आसनाने पाठीचा कणा आपोआपच सरळ होतो. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वातही त्याचा विशेष फायदा होतो. स्त्रियांसाठी या आसनाचा विशेष फायदा होतो कारण मासिक पाळीच्या समस्यांवर हे आसन फार उपयुक्त आहे.

हे आसन कोणी करू नये ?

वज्रासनाचे अनेक चांगले फायदे आहेत मात्र एक विशेष काळजी सर्वांनी घ्यायला हवी. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास होतो त्यांनी वज्रासन करू नये. अन्यथा याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

आरोग्यविषयक वृत्त

पालकभाजी आरोग्यासाठी फायदेशीर

फक्त “दारूमुळेच” जगभरात दरवर्षी ६ टक्के लोकांचा मृत्यू

या टिप्स वाचून “मानसिक” आजाराला करा बाय-बाय

जाणून घ्या. कुष्ठरोगाबाबतचे समज-गैरसमज

लहान मुलांचा “ताप” कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय

मोबाईल आणि कंप्युटरचा जास्त वापर करणाऱ्यांनी अशी घ्यावी ” डोळ्याची ” काळजी

सिने जगत

‘२०२०’ मध्ये विकी कौशल आणि टायगर श्रॉफची ‘टक्‍कर’ या चित्रपटांमधून

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

Loading...
You might also like