देशात व्यवसाय करण्यासाठी ‘ही’ आहेत सर्वोत्तम ‘शहर’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली एनसीआर मध्ये सध्या स्टार्टअपची संख्या 7000 पेक्षा अधिक झाली आहे. याशिवाय या भागात 10 यूनिकॉर्न देखील आहे. या कंपन्यांमध्ये व्हॅल्युएशन 50 अरब डॉलरच्या जवळपास आहे. दिल्ली एनसीआर आणि जिनोवच्या एका अहवालानुसार ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालात सांगण्यात आले आहे की स्टार्टअप आणि युनिकॉर्नच्या प्रकरणात बंगळुरू आणि मुंबईच्या तुलनेत दिल्ली एनसीआर पुढे आहे.

23 टक्के स्टार्टअप दिल्ली – एनसीआरमध्ये
टर्बोचार्जिंग दिल्ली एनसीआर स्टार्ट अप इकोसिस्टम असे नाव असलेल्या या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, देशातील एकूण स्टार्टअपमध्ये 23 टक्के दिल्ली एनसीआरमध्ये आहे. दिल्लीत एनसीआर स्टार्टअप संख्या 7,039 आहे. बंगळुरुमध्ये याची संख्या 5,234, मुंबईमध्ये 3,829 आणि हैद्राबादमध्ये 1,940 आहे.

या नव्या कंपन्यांची स्थापना 2009 पासून 2019 दरम्यान झाली, दिल्लीत 4,491 एवढी स्टार्टअपची संख्या आहे तर गुरुग्राममध्ये 1,544 आणि नोएडामध्ये 1,004 स्टार्टअप आहेत.

दिल्ली एनसीआरमध्ये 10 यूनिकॉर्न कंपन्या आहेत. तर या कंपन्यांचे मुल्यांकन एक अरब डॉलर पेक्षा अधिक आहे. बंगळूरुमध्ये अशा कंपन्यांची संख्या 9 आहे, तर पुणे, मुंबईत यांची संख्या 2-2 आणि चेन्नईमध्ये 1 अशी आहे.

सक्रिय प्रौद्योगिकी स्टार्टअपची संख्या 12,000 पर्यंत आहे. तर यूनिकॉर्नची संख्या 30 पर्यंत आहे. कंपनीचे मूल्याकंन 150 अरब डॉलर पेक्षा आधिक आहे.