KBC च्या इतिहासात ‘हे’ पहिल्यांदाच ! ‘अशी’ होणार स्पर्धकांची निवड, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन –कौन बनेगा करोडपती या मालिकेचे चाहते नेहमीच मालिकेसाठी प्रतिक्षा करत असतात. सध्या लॉकडाऊनच्या काळात सारं काही ठप्प असलं तरी केबीसीच्या 12 व्या सीजनसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यावेळी शोमध्ये बरंच काही वेगळं असणार आहे.

अशी होणार निवड

यावेळी केबीसी हा शो पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. पूर्वी ऑडिशन व्हायचं. लोकाना जरनल नॉलेजचे प्रश्न विचारले जात होते. यानंतर इंटरव्यु व्हायचा जे यावेळी होणार नाही. यावेळी निवड डिजिटल पद्धतीनं होणार आहे. असंही सजमत आहे की, ही निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे.

अशीही माहिती आहे की, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर उमेदवारांची जनरल नॉलेज टेस्ट ऑनलाईन होणार आहे. यानंतर ऑनलाईन पद्धतीनंच व्हिडीओ सबमिशन होईल. यानंतर फायनल राऊंडसाठी काही उमेदवारांचा पर्सनल इंटरव्यु घेतला जाईल जो व्हिडीओ कॉलच्या माध्यमातूनच होणार आहे.

रजिस्ट्रेशनचही ही प्रक्रिाय जुलैपर्यंत चालणार आहे. यानंतर मेकर्स निर्ण घेतील कसं काम करायचं ते. अमिताभ बच्चन यांनी घरीच प्रोमो शुट केला आहे ज्यात त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी काही प्रश्न विचारले आहेत.

एका इंग्रजी वृत्तानुसार, सोनीचे बिजनेस प्लानिंग आणि कम्युनिकेशन हेड अमित रायसिंघानी म्हणाले की, लॉकडाऊन असूनही स्पर्धकांची संख्या वाढली आहे. हा पहिला सीजन असणार आहे ज्यात स्क्रिनिंग पासून तर सिलेक्शनपर्यंतची सर्व प्रोसेस ऑनलाईन असणार आहे.