‘ही’ 5 झाडे देशात सर्वांत विषारी ; सेवनानंतर काही मिनीटांमध्ये जीव घेतात, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : निसर्गातील झाडेझुडपे अनेकप्रकारे आपल्याला उपयोगी असतात. आपल्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ ठेवण्याबरोबरच अनेक औषधी उपयोगही आहेत. परंतु काही झाडे असेदेखील असतात ज्या आपल्यासाठी जीवघेण्या ठरू शकतात. आज अशा काही विषारी झाड-झुडुपांबद्दल जाणून घेऊ.

या आहेत भारतातील सर्वाधिक विषारी वनस्पती :

१. विस्टेरिया :

 हि वनस्पती भारतासहित जगामध्ये प्रत्येक ठिकाणी आढळून येते. याचे फूल जांभळ्या रंगाचे आणि सुंदर असते. मात्र जेवढे हे फूल सुंदर दिसते तेवढेच ते धोकादायकही असते. या वनस्पतीचा कोणताही भाग खाण्यात आल्यास डोकेदुखी, सुस्ती, अर्धशिशी, कमजोरी, ताप येणे इत्यादी त्रास होऊ शकतो. थोडक्यात हि वनस्पती पूर्णतः विषारी आहे.

२. सुसाइड ट्री :

नावाप्रमाणेच या वनस्पतीचा वापर करणे म्हणजे आत्महत्या करण्यासाखेच आहे. हि वनस्पती केरळ आणि त्याच्या आसपासच्या भागात आढळते. केरळमध्ये या वनस्पतीमुळे अनेक लोकांचा जीव लागेल आहे. हिच्या फळे आणि फुलांमध्ये खुप जास्त विष असून याचा प्रभाव इतका असतो कि काही क्षणांतच व्यक्ती मृत्युमुखी पडतो. या वनस्पतींमध्ये एल्कलाईड नावाचा घटक असतो.

३. गुलाबी मटर :


या वनस्पतीची उंची २० फूट असून याची शंग मटारच्या शेंगेसारखी असते ज्यात लाल रंगाच्या बिया असतात. या बिया चुकूनही खाल्ल्यास माणसाचा तात्काळ मृत्यू होऊ शकतो इतक्या त्या विषारी असतात. या खाण्यात आल्यास ताप येणे, पोट बिघडणे, उलटी येणे, गुंगी येणे अशी लक्षणे दिसून येतात.

४. कन्हेर :

कन्हेरीचे झाड तर भारतात सर्वत्र आढळत असल्याने ते सर्वांनाच परिचित असते. या वनस्पतीची मुळे आणि बिया अत्यंत विषारी असतात. याच्या याची एक बी डाइगाक्सीन च्या १०० बियांप्रमाणे असते. यांच्या सेवनाने हृदयाची धडधड कमी होऊन अचानक थांबते ज्यामुळे माणूस मरू शकतो.

५. एरंड :

हे झुडूप भारताशिवाय फ़्रांस, स्पेन, इटली, अमेरिका, लीबिया, टांजानिया, केनिया इत्यादी देशांमध्ये देखील आढळून येते. यामध्ये टॉक्सिन नावाचा घटक आढळत असून हे अत्यंत विषारी असते. याच्या सेवनाने ब्लड प्रेशर सहित पोटासंबंधीच्या अनेक समस्या देखील उद्भवू शकतात. जर वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर व्यक्तीचा जीवदेखील जाऊ शकतो.

आरोग्य विषयक वृत्त

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

मधमाशी चावल्यावर वेदना कमी होण्यासाठी करा ‘हे’ उपाय

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा