‘या’ कारणामुळे पुरुष शारीरिक संबंधात रस नसल्याचं दाखवतात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनेकदा महिलांना असं म्हणणं असतं की, त्यांच्या पार्टनरला शारीरिक संबंधांमध्ये जास्त रस नाही असं दिसून येत असतं. याबद्दल महिलांच्या मनात अनेदा सवाल उपस्थित होताना दिसतात. परंतु त्यांच्या शंकेचं निरसणं करेल अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. त्यातून असं समोर आलं आहे की, पुरुषांना शारीरिक संबंधांमध्ये जास्त रस नाही असे ते केवळ आणत असतात. आपल्याला शारीरिक संबंध ठेवता यावेत आणि आपल्या पार्टनरने संबंधासाठी पुढाकार घ्यावा यासाठी पुरुष असा खोटा आव आणतात. पंरतु पुरुष असे का करतात याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

1) महिलांनी इंटरेस्ट कमी दाखवणे – जर्नल ऑफ इव्होल्युशनरी बिहेविरिअल सायन्सेजमध्ये प्रकाशित शोधाचे प्रमुख लेखक मॉन्स बेन्डिक्सन म्हणतात की, “या संशोधनासाठी काही महिला आणि पुरुषांना सहभागी करून घेण्यात आले. यात सहभागी अर्ध्याहून अधिक पुरुषांचं असं म्हणणं होतं की, महिलांसोबत संबंध ठेवण्यास ते तयार आहेत. परंतु अधिक महिला यासाठी इंटरेस्टेड नसल्याचं दिसून आलं. जोपर्यंत त्यांना एखादा पुरुष आकर्षक वाटत नाही तोपर्यंत त्यांचा कमी असलेला इंटरेस्ट तसाच राहिल्याचे दिसून आले.

2) इंटरेस्ट नसल्याचा पुरुषांचा खोटा आव – पुरुषांना शारीरिक संबंध तर ठेवायचे असतात परंतु त्यात त्यांना रस नाही असा खोटा आव पुरुष आणत असतात. याला खास कारणही असावे. कारण कोणाही सोबत शारीरिक संबंध ठेवण्यास उतावीळ असलेला पुरुष कोणत्याच महिलेला आवडत नाही. कदाचित यामागे हेच कारण असावे. हा सर्व स्टॅटीक म्हणजेच रणनीतीचा खेळ आहे अस अभ्यासकांचं म्हणणं आहे. महिला आणि पुरुषांना खरंच काही वाटणं आणि त्यांचा उद्देश हा ते एकमेकांना देत असलेल्या संकेतांपेक्षा वेगळे असू शकतात अशीही माहिती संशोधनातून समोर आली आहे.

3) महिलांचे इंटरेस्टपेक्षाही अधिक संकेत देणं – संशोधनातून समोर आले आहे की, जे पुरुष शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जास्त उत्सुक असतात ते त्यांना संबंध ठेवायचे आहेत असे संकेत फार कमी देतात. तसेच अशीही माहिती समोर आली आहे की, महिला प्रत्यक्षात शारीरिक संबंध ठेवण्यास जेवढ्या उत्साही असतात, त्यापेक्षा ते जास्त उत्साही आहेत असे संकेत देतात. याला कारणंही तसेच आहे. पुरुषांना त्यांच्याविषयी वाटणारं अ‍ॅक्ट्रॅक्शन आणि ते देत असलेलं अटेंशन हे जास्त वेळ आणि कायम रहावं अशी महिलांची इच्छा असते असं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

You might also like