..म्हणून संजय दत्त ‘कलंक’च्या प्रमोशनपासून होता दूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मल्टिस्टारर आणि बुप्रतिक्षित कलंक हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. कलाकारांनी चित्रपटाचं जोरदार प्रदर्शन केलं होतं. परंतु या सर्वात एक कलाकार कुठेच दिसला नाही. तो म्हणजे संजय दत्त. अनेकांना प्रश्न पडला की, कलंकच्या प्रमोशन मध्ये संजय दत्त का नव्हता. त्याला जाणीवपूर्वक प्रमोशनपासून दूर ठेवण्यात आल्यचाी चर्चाही होती.

दरम्यान एका वृत्तपत्राने दिलेल्या वृ्त्तानुसार, संजय दत्तला कलंक च्या प्रमोशनपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलं होतं. याचं कारण म्हणजे दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे आहे. कलंकच्या प्रमोशनमध्ये संजय दत्त याची उपस्थिती नसणे याच्याशी राजकुमार हिरानी यांचं कनेक्शन असल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे.

एका महिलेने काही दिवसांपूर्वी मीटून मोहिमेअंतर्गत राजकुमार हिरानी यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले होते. त्यावेळी संजय दत्तने हिरानींची पाठराखण केली होती. त्या आरोपांवर मला विश्वास नाही असं संजयने म्हटलं होतं. त्यांची पाठराखण करणं संजयला भोवलं. संजयला यानंतर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. सोशल मीडियावर त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती. ही टीका पाहूनच निर्मात्यांनी संजयला प्रमोशनपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. काहींचं म्हणणं असं आहे की, माधुरी दीक्षितमुळे संजयला प्रमोशनपासून दूर ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान संजय दत्तने त्याच्या प्रमोशनपासून लांब राहण्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. संजय दत्त म्हणाला की, “मुख्य प्रमोशनल कार्यक्रम सोडून मी कोणत्याच प्रमोशन मध्ये सहभागी होणार नाही असं मी या चित्रपटाला होकार देतानाच सांगितले होते. तशी अटच मी निर्मात्यांसमोर ठेवली होती. माझी या सिनेमात सहाय्यक भूमिका आहे, मुख्य नाही. त्यामुळे मी नसलो तरी चित्रपटाच्या प्रमोशनवर त्याचा कुठलाच परिणाम होणार नव्हता.” असे संजय दत्त म्हणाला.

Loading...
You might also like