Pune News : ‘हीच योग्य वेळ आहे’, धनंजय मुंडे प्रकरणी प्रकाश आंबेडकरांचं सूचक विधान (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  राज्याचे समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी राजीनाम्याची मागणी होत आहे. या प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर बोलताना “हीच योग्य वेळ आहे. अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले “शरद पवार यांनी स्वतः सांगितले आहे की हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घ्यायचं की नाही हे त्यांनी ठरवायचं आहे. तसेच कधी ना कधी कोणाचा तरी गुन्हा बाहेर पडतोच. त्यामुळे आता तुम्हीच म्हणा ‘धिस ईज अ राईट टाईम’

तसेच त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांना औरंगाबादनंतर आता उस्मानाबादचे देखील नामांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, याबाबत विचारले तेव्हा सरकार टिकवायचं की नाही ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठरवायचं आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पुढे म्हणाले कि, कृषी कायद्यांविरोधात मुस्लिम समाज २७ जानेवारीला वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार आहे, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात मागील दीड महिन्यापासून शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची दखल न्यायालयाने घेतली असून त्यावर एक समिती स्थापन देखील केली आहे. मात्र, या समितीला शेतकर्‍यांनी विरोध दर्शवला आहे. तर दोन वर्षापुर्वी NRC, CAA च्या विरोधात मुस्लिम समाजाकडून दिल्ली येथे शाहिन बाग येथे आंदोलन केले होते. असे त्यांनी स्पष्ट केले.