मोबाईल : नाही पडणार महाग ‘कॉल’चा ‘रेट’, तात्काळ फक्त ‘हे’ काम करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 1 डिसेंबरनंतर एअरटेल आणि वोडाफोन आयडिया कंपनी आपले कॉल रेट आणि इंटरनेट डाटाच्या किंमती वाढवणार आहे. ही माहिती येताच रिलायन्स जिओने देखील आपले कॉल रेट आणि डेटाच्या किंमती वाढवेल. देशात या 3 मोबाइल कंपन्यांचे जवळपास 90 टक्के ग्राहक आहेत. म्हणजेच देशातील सर्व कॉल रेट आणि इंटरनेट डेटाच्या किंमती 10 दिवसांनंतर वाढेल. त्याचा परिणाम तुमच्यावर देखील होईल. परंतू या महागड्या दरापासून तुम्हाला थोडासा दिलासा मिळू शकतो. कारण एकदा का या कंपनींने त्याचे दर वाढवले की तुम्हाला याचा फायदा घेता येणार नाही.

काय करावे लागेल
देशातील नियमांनुसार मोबाइल ग्राहकांचा जो प्लॅन सुरु आहे तो प्लॅन कंपनी अचानक रद्द करु शकत नाही किंवा त्यात बदल करु शकत नाही. कंपनी फक्त नवा प्लॅन आणू शकते, परंतू हा प्लॅन तुमच्या प्लॅनची वैधता सुरु आहे तोपर्यंत सुरु राहू शकतो. परंतू तुम्हाला वाटत असेल की तुमच्या रिचार्जचे पैसे वाढू नये तर तुम्हाला मोबाइलचे 1 वर्षाचे रिचार्ज करावे लागेल. जर तुम्ही कॉल रेट वाढण्याआधी 1 वर्षाचे रिचार्ज केले तर तुम्हाला 1 डिसेंबरपासून लागू होणारे नवे दर लागू होणार नाहीत.

त्यामुळे तुम्हाला माहित हवे की जिओ, वोडाफोन आयडिया आणि एअरटेलचे 1 वर्षाचे रिचार्ज प्लॅन काय आहेत, त्यात काय सुविधा मिळते.

जिओचा 1 वर्षाचा रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओचा 1 वर्षांचा रिचार्ज प्लॅन 1699 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये रोज 1.5 जीबी डाटा मिळतो. डाटाचा हा लिमिट संपल्यानंतर अनलिमिटेड डाटा अंतर्गंत 64 केबीपीएसचा स्पीड मिळतो. याशिवाय 100 मेसेज रोज. तर अनलिमिडेट कॉलिंग फ्री. यात लोकल बरोबरच रोमिंग देखील सहभागी आहे. कंपनीकडून जिओ अ‍ॅप फ्री. याशिवाय मध्ये डाटा संपला तर टॉप अपची सुविधा. म्हणजेच 1699 रुपयांचे रिचार्ज केल्यावर कंपनीने दर जरी वाढवले तरी कोणतेही टेशन नाही. त्यांचा प्लॅन सुरक्षित आहे.

वोडाफोन-आयडियाचा 1 वर्षाचा प्लॅन
कंपनी हा प्लॅन 1699 रुपयांत देते. याअंतर्गत 1.5 जीबी इंटरनेट डाटा मिळतो. इंटरनेट डाटाचे लिमिट संपल्यावर अनलिमिडेट डाटाचा स्पीड कमी होईल. याशिवाय 100 मेसेज दिवसाला फ्री. अनलिमिटेड कॉल. रोमिंगचा सहभाग. तसेच कंपनीच्या अॅपच्या माध्यमातून फ्री मनोरंजन. याशिवाय इंटरनेटडाटा संपल्यावर टॉप अपची सुविधा मिळेल. म्हणजेच 1699 रुपयांत 1 वर्षात कितीही रिचार्चचे दर वाढले तरी कोणतेही एक्स्ट्रा पैसे देण्याची गरज नाही. तुमचे रिचार्ज सुरक्षित असतील.

एअरटेलचा 1 वर्षाचा प्लॅन
एअरटेलकडे 1 वर्षाचा प्लॅन आहे जो 1699 रुपयांचा आहे. यात 1.4 जीबी डाटा देण्यात येतो. डाटा लिमिट संपल्यानंतर अनलिमिटेड डाटा परंतू कमी वेगाने वापरता येईल. तसेच रोज 100 मेसेज फ्री अनलिमिडेट कॉल सह रोमिंग फ्री. कंपनीच्या अ‍ॅपच्या माध्यमातून मनोरंजन फ्री मिळेल. याशिवाय डाटा संपल्यानंतर टॉप अप रिचार्जची सुविधा मिळेल. म्हणजेच 1699 रुपयांत सर्व लाभ, शिवाय 1 वर्षात रिचार्जचा प्लॅन कितीही महागला तरी चिंता नाही. तुमचा प्लॅन सुरक्षित राहिलं.

Visit :  Policenama.com