‘ही’ जगातील सर्वात महागडी पाण्याची बाटली, किंमत 42 लाख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जीवनात पाण्याला किती महत्व आहे, हे आपण सर्वजण जाणतोच. तहान लागली असेल आणि पाणीच मिळाले नाही तर जीव जाईल, अशी भिती सर्वांनाच वाटते. एका अभ्यासानुसार माणूस काहीही न खाता चार आठवड्यापर्यंत जिवंत राहू शकतो, परंतु पाण्याशिवाय 4 दिवसांपर्यंतच राहू शकतो. आपण प्रवासाला बाहेर पडतो तेव्हा पाण्याची बॉटल जवळपास 20 ते 25 रूपयाला खरेदी करतो. परंतु, इतकी कमी किंमतही आपल्याला जास्त वाटते.

पण, एक अशी पाणी बॉटल आहे जिची किंमत 60000 अमेरिकन डॉलर आहे. भारतीय रूपयांत पाहिले तर या बॉटलची किंमत सुमारे 42 लाख रूपये होते. हे पाणी फ्रांस आणि फिजीच्या वॉटर स्प्रिंगमधून काढण्यात येते. ही पाणी बॉटल पावलो डी विराजीने तयार केली होती. या पाण्यात 25 ग्रॅम स्वर्णभस्म मिसळले जाते. बाटलीला 24 कॅरेट सोन्याने सजवले जाते. यामध्ये आणखी व्हरायटी आहेत. जसे की हिरा ,प्लॅटिनम आणि चांदी. हे पाणी बनविणार्‍या कंपनीला खुप दूरचा प्रवास करावा लागतो आणि सर्वात स्वच्छ पाणी द्यावे लागते. या कारणामुळे हे पाणी खुप महागडे आहे.

परंतु, कंपनीला हे पाणी बनवण्यासाठी जास्त खर्च येत नाही, कारण कंपनी एकाचवेळी भरपूर पाणी तयार करते. हे पाणी प्यायल्याने माणसाची प्रकृती सुधारते, तणाव कमी होतो, शरीरातील चरबी कमी होऊ लागते.