विजय माल्ल्याला उधार पैसे देणारी ‘ही’ आहे तिसरी बायको

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मी सध्या पत्नी आणि मुलाकडून पैसे उधार घेऊन जगत आहे अशी माहिती विजय माल्ल्यानं कोर्टात दिली आहे. विजय माल्ल्याला पैसे देणारी ही पत्नी माल्ल्याची तिसरी पत्नी आहे. पिंकी लालवानी असं या माल्ल्याच्या तिसऱ्या पत्नीचं नाव आहे. पिंक लालवानीची कमाई एका वर्षाला 1.35 कोटी रुपये आहे. पिंकी लालवानी 39 वर्षांची असून 2011 मध्ये माल्ल्यानं पिंकीला किंगफिशर एअर लाईन्समध्ये एअर हाॅस्टेसची नोकरी दिली होती. किंगफिशर एअर लाईन्ससाठी जाहिरातही केली आहे. पिंकी ही विजय माल्ल्याची तिसरी पत्नी असून सध्या पिंकी माल्ल्यासोबत लंडनमध्ये वास्तव्यास आहे.

विजय माल्ल्यानं पहिलं लग्न एअर हॉस्टेस समीरा हिच्यासोबत केलं होतं. सिद्धार्थ माल्ल्या हा समीरा आणि विजय माल्ल्या या दोघांचा मुलगा आहे. परंतु नंतर माल्ल्याने समीरासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर माल्ल्यानं 1993 मध्ये त्याची लहानपणीची मैत्रीण रेखा हिच्यासोबत लग्न केलं. रेखाची याआधी दोन लग्नं झाली होती. तिला कबीर आणि लैला अशी दोन मुलं होती. विजय माल्ल्यानं रेखाशी लग्न केल्यानंतर लैलाला दत्तक घेतले. माल्ल्यापासून रेखाला दोन मुली आहेत. तान्या आणि लिएना अशी त्यांची नावे आहेत.

2011 पासून पिंकी लालवानी ही विजय माल्ल्यासोबत राहू लागली. त्यानंतर त्यांची जवळीक दिवसेंदिवस वाढू लागली. जेव्हा माल्ल्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ही क्रिकेट टीम विकत घेतली त्यावेळी देखील पिंकी माल्ल्यासोबत दिसून आली. आयपीएलच्या मॅचदरम्यानही पिंकी दिसून आली. तिची एन्ट्रीही एखाद्या मालकाप्रमाणे होती. तिचा वावर दिवसेंदिवस वाढत गेला.

पिंकी लालवानी ही विजय माल्ल्याच्या अनेक कंपन्यांमध्ये भागीदार आहे. ती सध्या त्याच्यासोबत लंडनमध्ये वास्तव्यास आहे. पिंकी लालवानी विजय माल्ल्याच्या लंडनमधील एका कंपनीमध्ये शेअर होल्डरदेखील आहे. भारतीय बँकांना 9 हजार कोटींचा चुना लावून विजय माल्ल्या पसार झाला आहे.