home page top 1

‘सारा-कार्तिक’च्या नात्याबद्दल पिता सैफ अली खाननं दिली ‘अशी’ प्रतिक्रिया !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सैफ अली खानची लाडकी सारा अली खानचं अभिनेता कार्तिक आर्यनशी नाव जोडलं गेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बी टाऊन मध्ये त्यांच्याबद्दल बोललं जाताना दिसत आहे. सारा आणि कार्तिक अनेकदा सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाले आहेत. शिवाय त्यांची ओळख होण्याआधी सारानेही एकदा कार्तिकवर तिचं क्रश असल्याचं म्हटलं होतं. नंतर पुढे त्यांची छान मैत्री झाली. आता तर नात्याच्याही चर्चा सुरू आहेत. या सगळ्यावर आता सैफ अली खानने प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तपत्राशी बोलताना सैफ म्हणाला, “एक व्यक्ती म्हणून सारा चांगली आहे. तिला काय हवं आहे याची तिला जाण आहे. मुळात तिला चांगल्याची पारख आहे. मला खात्री आहे तो(कार्तिक) चांगलाच असणार. मला साराच्या प्रत्येक संस्कारावर आणि निर्णयावर विश्वास आहे. त्यामुळे साराला जर कार्तिक आवडत असेल तर तो नक्कीच चांगलाच असणार. यात काहीही शंका नाही.”

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, कार्तिक आणि सारा लवकरच लव आज कल या सिनेमाच्या सिक्वलमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. इम्तियाज अली यांनी हा सिनेमा डायरेक्ट केला आहे.

View this post on Instagram

Eid Mubarak 💫

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

 

Visit : policenama.com

Loading...
You might also like