PM मोदींच्या जन्मदिनाचा केक कापण्यास मंत्र्यांनी केला ‘विरोध’

गोहत्ती : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रमाणे आसाममध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात केक आणण्यात आला. मात्र तो केक पाहून अर्थमंत्री हिमंत सरमा यांनी तो केक कापण्यास नकार दिला व तेथे उपस्थित असलेले मुख्यमंत्री सबानंद सोनोवाल यांनीही केक कापू नये, अशी विनंती करण्यात आली. त्यांनी ती विनंती मान्य केली. त्यामुळे वाढदिवसाच्या कार्यक्रमात केक आणण्यात आला असतानाही तो केक कापण्यात आला नाही, असे प्रथमच घडले असावे.

याचे कारण त्या केकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र तयार करण्यात आले होते. केक कापला तर आपल्या नेत्याचे छायाचित्र कापले जाईल, या विचाराने हिमंत सरमा यांनी हा केक कापू दिला नाही.
भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रर्त्यांनी तिनसुकिया येथील गुलाबचंद्र नार्टय मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात भला मोठा केक आणण्यात आला. सरमा हेही केक कापण्यास सज्ज झाले. मात्र, केक कापण्यापूर्वी त्यावरील मोदी यांचे छायाचित्र पाहून ते थांबले व त्यांनी केक कापला नाही. आपण केक कापला असता तर आपल्या प्रिय नेत्याचे छायाचित्र का असेना ते कापावे लागले असते. त्यामुळे केक कापण्यात आला नाही, असे त्यांनी सांगितले.

You might also like