Coronavirus Lockdown :अडचणीत ‘देवदूता’पेक्षा कमी नाहीत ‘हे’ घरमालक, सरसकट 50 भाडेकरूंचा माफ केला ‘रेंट’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – जगावर कोरोनाचे मोठं संकट आहे. या दरम्यान भारतात सर्वात जास्त हाल होत आहेत ते त्या लोकांचे जे मजुरीवर आपला दिवस घालवतात. आता या लोकांवर अशी वेळ आली आहे की पोटाला जेवण नाही आणि भाड्याने राहत असलेल्या घराचे भाडे देण्यासाठी पैसे नाहीत. कारण देशात मागील महिन्यापासून कोरोनाचं मोठं संकट आहे आणि देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. परंतु या काळात एका घरमालके जवळपास 50 लोकांचे भाडे माफ केले आहे. हा घरमालक या लोकांसाठी एखाद्या देवापेक्षा कमी नाही.

लॉकडाऊन दरम्यान घरभाडे माफ –
उत्तर प्रदेशातील नॉएडामधील बरोला भागात राहणाऱ्या कुशल पाल यांनी आपले जेवढे भाडेकरु होते त्यांचे भाडे माफ केले आहे. कुशल पाल यांच्या घरात 50 भाडेकरी राहतात. दर महिन्याला या सर्वांकडून कुशल पाल यांना दीड लाख रुपये भाडं मिळत होतं. कुशल पाल यांचे हे भाडेकरु मजदूर म्हणून काम करतात आणि रोजावर काम केल्यानंतर त्यांंना पैसे मिळतात. परंतु या भाडेकरुंची आता इतकी दयनीय अवस्था आहे की त्यांच्या जेवण्याचे देखील हाल झाले आहेत. त्यामुळे कुशल पाल यांनी त्यांना ही सवलत दिली.

भाडेकऱ्यांच्या जेवणाचे हाल होऊ नये म्हणून ते वेळोवेळी भाडेकरुंसाठी जेवण देखील मागवत आहेत. त्यांनी सर्व भाडेकरुंना सांगितले आहे की कोणीही घर सोडू नये, सर्वांनीच येथेच रहावे.

देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने मजदूरांच्या नोकऱ्या जात आहेत तसेच भारतात कोरोनाचा आकडा वाढत आहे. मृतांचा आकडा देखील वाढत आहे. सरकारने देखील सांगितले आहे की लोकांनी लॉकडाऊनदरम्यान घराबाहेर पडून नये.