सलाम ! 32 वर्षांपासून पगार न घेता रोज 13 तास ड्यूटी करतात ‘हे’ वृद्ध

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीलमपुर लाल बत्ती चौकातून जाताना एक वृद्ध व्यक्ती ट्रॅफिक पोलिसांसारखा गणवेश घालून अनेक वर्षांपासून ट्रॅफिक व्यवस्था नियंत्रित करताना दिसतो. त्या व्यक्तीचे नाव गंगाराम आहे, जो मागील 32 वर्षांपासून पगार न घेता हे काम करत आहे.

गंगाराम सकाळी 9 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत सीलमपुर लाल बत्तीवर ट्रॅफिक व्यवस्था नियंत्रित करतात. या दरम्यान ते आपल्या हातात काठी ठेवतात, ज्याद्वारे लोक आणि गाड्यांना दिशा दाखवता येते. हे पाहून आपल्या मनात प्रश्न येतो की, 32 वर्षांपासून हा माणूस पगार न घेता हे काम का करत आहे.

गंगाराम असे करण्याचे एक कारण आहे. एका रोड अपघातात त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. यानंतर एका रोड अपघातात त्यांच्या पत्नीचे निधन झाले आणि ते एकटे पडले. गंगारामने मुलगा आणि पत्नीच्या मृत्यूनंतर एक प्रतिज्ञा केली की, जो पर्यंत जिवंत राहीन तोपर्यंत माझ्या भागात रोज ट्रॅफिक व्यवस्था सांभाळण्याचे काम करेन.

त्यांच्या या कामाचे अनेक लोक कौतूक करतात आणि काही लोक त्यांना नवीन ड्रेस व इतर वस्तूसुद्धा ऑफर करतात परंतु ते कुणाकडूनही गिफ्ट घेत नाहीत, नकार देतात. ते कोणत्याही स्वार्थाशिवाय, कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी ट्रॅफिक नियंत्रित करत आहेत.

मुलगा आणि पत्नीच्या मृत्यूनंतर गंगाराम प्रथम एका दुकानात इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरूस्त करण्याचे काम करत असत. मुलाला झालेल्या अपघाताने त्यांचे जीवनच बदलून टाकले आणि ट्रॅफिक पोलिससारखा गणवेश घालून ते लोकांच्या सुरक्षीत प्रवासाठी ट्रॅफिक नियंत्रण करू लागले.

कोरोना व्हायरसच्या काळात लोक घराबाहेर पडायला घाबरत असताना, गंगाराम अजूनही आपली ड्यूटी करत आहेत. त्यांना प्रत्येक 15 ऑगस्ट आणि 26 जोनवारीला अनेक संस्था सन्मानित करतात. त्यांना पोलिसांकडून सुद्धा अनेक मेडल मिळाली आहेत.