‘या’ व्यक्तीनं केली होती PAKISTAN शब्दाची निर्मिती, जरूर जाणून घ्या याचा फुलफॉर्म

नवी दिल्ली : पाकिस्तानबाबत तुम्हाला खुप काही महित असेल, पण तुम्हाला त्या व्यक्तीच्या बाबत माहिती आहे का, ज्याने पाकिस्तान या शब्दाची निर्मिती केली होती. तुम्हाला पाकिस्तान या शब्दाचा फुलफॉर्म माहिती आहे का. आज आपण या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. पाकिस्तान शब्द भारतीय लोकांना खुप चांगल्या प्रकारे माहित आहे. नेहमी पाकिस्तानकडून होणार्‍या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या बातम्या न्यूज पेपरमध्ये येत असतात.

पाकिस्तानकडून होणार्‍या शस्त्रसंधीच्या घटनांमुळे सीमावर्ती भागात राहणार्‍या लोकांचे खुप मोठ्याप्रमाणात नुकसान होते. अनेक घटनांमध्ये लोक मारले सुद्धा जातात. पाकिस्तानसोबत भारताचे अनेकदा युद्धही झाले आहे, आणि प्रत्येक युद्धात भारताने पाकला धडा शिकवला आहे. सध्याचे लोक मुहम्मद अली जिन्ना यांना पाकिस्तानचे पिता तथा निर्माता मानतात. परंतु, खुप कमी लोक त्या व्यक्तीला ओळखतात ज्याने पाकिस्तान या शब्दाची रचना केली होती. या व्यक्तीबाबत जाणून घेवूयात.

चौधरी रहमत अली होते पाकिस्तान शब्दाचे निर्माता

जगाला पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम 28 जानेवारी 1933 ला माहित झाला. हा शब्द अल्लामा इकबालने किंवा मुहम्मद अली जिन्ना यांनी निर्माण केलेला नाही. या शब्दाचे रचनाकार होते चौधरी रहमत अली, त्यांनीच या शब्दाची निर्मिती केली होती. चौधरी रहमत अली यांचे प्राथमिक शिक्षण मुस्लिम पद्धतीने झाले होते. ज्यामुळे त्यांच्या मनावर मुस्लिम थिअरीची छाप होती. यामुळेच त्यांचे विचार मुस्लिम समर्थक होते. नंतर त्यांनी इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास केला. 28 जानेवारी 1933 ला रहमत अली यांनी नाऊ ऑर नेव्हर नावाचे एक पुस्तक प्रसिद्ध केले. हे तेच पुस्तक आहे ज्यामध्ये प्रथम पाकिस्तान या शब्दाचा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर 1 ऑगस्ट 1933 ला रहमत अली यांनी पाकिस्तान नावाचे एक साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू केले.

हा आहे PAKISTAN शब्दाचा फुलफॉर्म

चौधरी रहमत अली प्रत्यक्षात सेपरेट मुस्लीम नेशन या संकल्पनेला मानणारे होते. रहमत अली यांनी 1933 मध्ये पाकिस्तान नॅशनल मूव्हमेन्टची सुरूवात केली होती. आपल्या साप्ताहिकात रहमत अली यांनी लोकांना पाकिस्तानचा योग्य अर्थ समजावण्यासाठी या शब्दाचा फुलफॉर्म सुद्धा लिहिला होता. जाणून घेवूयात रहमत अली यांच्यानुसार पाकिस्तान शब्दाचा फुलफॉर्म काय आहे.

P- Punjab

A- Afghania (North-West Frontier Province)

K- Kashmir

S- Sindh

Tan- BALOCHISTAN

अशा प्रकारे वरून लिहिलेल्या छोट्या मोठ्या भागांचा मिळून तयार झालेल्या पाकिस्तान नावाच्या वेगळ्या देशाचे स्वप्न रहमत अली यांनी पाहिले होते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे वरच्या फुलफॉर्ममध्ये के अक्षर काश्मीर प्रदेशासाठी वापरण्यात आले आहे जो भारतात आहे. याच कारणामुळे अनेक वर्षांपासून पाकिस्तानचा काश्मीरवर डोळा आहे.