#Video : सर्वाधिक मानधन घेणारी ‘ही’ आहे टॉपची ‘मराठमोळी’ अभिनेत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य तर करतातच परंतु आपल्या कामाचंही खूप तगडं मानधन घेतात. सई ताम्हणकर, प्रिया बापट, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी अशा अनेक अभिनेत्री सांगता येतील. परंतु तुम्हाला माहीत आहे का की, सर्वात मानधन घेणारी अभिनेत्री नेमकी कोणती आहे. याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत.

तुम्हाला माहीत नसेल परंतु पूर्वी सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांच्या मानधनाची चर्चा व्हायची. परंतु सैराट सिनेमा आला आणि आर्ची म्हणजे रिंकु राजगुरु घराघरात पोहोचली. आपल्या अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री रिंकु प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली. तुम्हाला सांगू इच्छितो की, रिंकु राजगुरु सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट झाली आहे.

 

मराठीतील ग्लॅमरस अॅक्ट्रेस साधारणपणे 15 लाखांच्या घरात मानघन घेत होत्या. रिंकुचं मानधन ऐकाल तर चकित व्हाल. कारण मानधनाबाबतीत रिंकुने इतर अॅक्ट्रेसला मागे टाकल्याचे दिसत आहे. सैराटनंतर रिंकु नुकतीच ‘कागर’ या सिनेमात दिसली होती. आता ‘मेकअप’ या सिनेमात ती दिसणार आहे. रिंकुने मेकअप या सिनेमासाठी रिंकुला निर्मात्याने 27 लाख रुपये देऊ केले आहेत. एक नवखी अभिनेत्री असूनही रिंकुने खूप कमी काळात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शिवाय एखाद्या नवख्या अभिनेत्रीने एवढं मानधन घेण्याची ही पहिलीच वेळ आहे हे विशेष.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी

 

You might also like