COVID-19 : दिलासादायक ! ‘या’ मोठया कंपनीनं तयार केली ‘कोरोना’ व्हायरसवरील ‘लस’, लवकरच ‘ट्रायल’ सुरू

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – जगातील सर्व मोठ्या कंपन्यांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी काम करण्यास सुरवात केली आहे. याच दरम्यान जॉनसन आणि जॉन्सन या आंतरराष्ट्रीय कंपनीचे नाव समोर आले आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, त्यांच्या वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरस लसीचा शोध लावला आहे. लस चाचणी लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.

एक अब्ज लस तयार करण्याचे लक्ष्य आहे
जॉन्सन अँड जॉनसन यांचे म्हणणे आहे की, बायोमेडिकल अ‍ॅडव्हान्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (बार्डा) यांच्यासह कंपनी जानेवारी 2020 पासून कोरोना विषाणूची लस तयार करण्याच्या संशोधनात सहभागी झाली होती. व्यापक संशोधनानंतर कंपनीने या प्राणघातक विषाणूंविरूद्ध लस तयार केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, लवकरच या चाचणीनंतर जगभरात एक अब्ज लसी तयार करुन त्यांचे वितरण केले जाईल.

अमेरिका, इंग्लंड आणि रशिया देखील लस देण्याची तयारी करत आहेत
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिका, इंग्लंड आणि रशियन सरकारही कोरोना विषाणूची लस तयार करण्यात व्यस्त आहेत. अमेरिका, लसींची क्लिनिकल चाचण्या चीन, दक्षिण कोरिया आणि फ्रान्समध्ये घेत आहेत. त्याच वेळी, इंग्लंडच्या ऑक्सफोर्डमध्ये लस तयार करण्याचा कार्यक्रम देखील सुरु आहे. रशियाने आपल्या लसीची चाचणी प्राण्यांवर करणे सुरू केले आहे.

उल्लेखनीय आहे की, आतापर्यंत जगभरात 7.85 लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यापैकी 37,686 लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1.65 लाख लोक बरे झाले आहेत.