रेल्वेनं बनवलं अतिशय ‘वेगवान’ इंजिन, रेल्वे मंत्र्यांनी स्वतः शेअर केला व्हिडीओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रवाशांच्या सुख सुविधेसाठी रेल्वे प्रशासन तत्परतेने काम करत असते. प्रवाशांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी रेल्वे प्रशासन आपल्या इन्फ्रा स्ट्रकचरमध्ये वारंवार बदल करत असते. वर्षाच्या सुरुवातीलाच प्रशासनाने इंजन लैस हाईस्पीड ट्रेन ‘वंदे भारत’ची सुरुवात केली होती. त्यानंतर काहीदिवसांआधी  रेल्वेकडून दिल्ली – मुंबई आणि दिल्ली – हावड़ा रूट वर 160 किलोमीटर प्रति ताशी स्पीडने  रेल्वेच्या संचालनासाठी मंजुरी दिली आहे. यासाठी आता भारतीय रेल्वेने 180 किमी प्रति ताशी स्पीडने पळणारे इंजिन तयार केले आहे.

प्रीमियम रेल्वेच्या वेगासाठी होणार फायदा –
हायस्पीड पद्धतीचे इंजिन बनवले गेले तर प्रीमियम आणि शताब्दी सारख्या रेल्वे गद्यामध्ये वेग वाढण्यासाठी खूप मदत होणार आहे आणि यामुळे जास्त लांबचा पल्ला गाठण्यासाठी आता रेल्वेला कमी वेळ लागणार आहे. हे इंजिन पूर्णतः भारतात बनलेले असणार आहे. रेल्वे प्रशासनाने सांगितले कि हे इंजिन पश्चिम बंगालच्या चितरंजन लोकोमोटिव वर्क्स फॅक्ट्रीमध्ये बनलेले आहे.

पियुष गोयल यांनी केलं ट्विट –
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करत सांगितले आहे की, हे इंजिन मेक इन इंडिया या योजनेअंतर्गत बनवण्यात आले आहे. यामुळे रेल्वेला आता चांगली गती मिळणार आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ सुद्धा गोयल यांनी शेअर केला आहे. ज्यात स्पीड मीटर मध्ये प्रति १८० किमी असा काटा सुद्धा दिसून येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –