अन्यथा … गणपती नाही तर, सरकारचे विसर्जन 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे | गणेश विसर्जन मिरवणुकीत आम्ही सहभागी होणार नाही – पुण्यातील गणेश भक्तपहा पोलीसनामा लाईव्ह…..

Geplaatst door Policenama op Zaterdag 22 september 2018

मुंबई उच्च  न्यायालयाने डॉल्बी बंदीचा निर्णय घेतला आहे. तो गणेश भक्तांना मान्य नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे अधिकार वापरून डॉल्बीला परवानगी द्यावी अन्यथा आमचा गणपती आणि मांडव जैसे थे राहील, मिरवणुकीत सहभागी होणार नाही असा खणखणीत ठराव  एकमताने करण्यात आला. तसेच कोणत्याही लोकप्रतिनिधींनी यात पुढाकार घेतला नाही. त्यांना मतांची गरज नाहीय कदाचित त्यांना माहितीय की त्यांना ईव्हीएम मशीन निवडून आणतात. अशी घणाघाती टीका माजी नगरसेविका आणि मनसेच्या महिला शहर अध्यक्षा वकील रुपाली पाटील -ठोंबरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेदरम्यान केली. मुंबई हाय कोर्टाने डॉल्बी सिस्टीम वाजवण्याकरिता बंदी केली आहे. यावर पुण्यातील गणेश मंडळांचे कार्यकर्ते, नगरसेवक विशाल धनवडे यांसह काही नगरसेवक आणि माजी नगरसेविका तथा मनसे महिला शहर अध्यक्षा वकील रुपाली पाटील -ठोंबरे यांनी पुणे पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e421f900-be51-11e8-9acb-4dab58c3de68′]

अन्यथा… सरकारचे विसर्जन …

उद्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीला परवानगी दिली नाही तर आम्ही आमचा गणपती मंडळातच ठेऊ, मांडव देखील काढणार नाही उद्या गणेश विसर्जन करणार नाही. आणि जर गणेश विसर्जन झाले नाही तर सरकारचे विसर्जन करू. अशी कडक भूमिका उपस्थित गणेश मंडळाचे कार्यकर्ते अजित जाधव यांनी व्यक्त केली. यात जवळपास पुण्यातील १०० पेक्षा जास्त गणेश मंडळांचा सहभाग आहे असेही यावेळी सांगण्यात आले.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f0262462-be51-11e8-9687-394fbfa414a3′]

निवडणूक प्रचार आणि सनबर्न च्या आवाजाचे काय ?

 यावेळी बोलताना रुपाली पाटील म्हणाल्या निवडनुकांचे प्रचार, पक्षाच्या सभा, तसेच इतर मोठे सण आणि सनबर्न सारख्या फेस्टिवल ना आवाजाची तीव्रता का तपासली जात नाही असा सवाल पोलीसनामा शी बोलताना केला. फक्त गणेशोत्सव  साजरे करतानाच का हा विचार केला जातो असेही त्या म्हणाल्या. आम्हाला न्यायालयाकडून डॉल्बी ला म्हणजेच चार बेस ना परवानगी मिळाली तरच आम्ही गणेश विसर्जन करू अन्यथा विसर्जन सहभागी होणार नाही. असे रुपाली पाटील यांनी स्पष्ट केले

यावेळी बोलताना साउंड आणि लाईट असोसिएशनचे सेक्रेटरी शिरीष पाठक म्हणाले की, ध्वनी प्रदूषणाचा विचार करता  मागील काही वर्षात चार बेस आणि चार टॉप ला मान्याता देण्यात आली होती. पण यंदा स्पिकर्स ना पूर्णपणे बंदी घातली आहे. याचा खूप मोठा परिणाम यातील व्यावसायिकांवर होत आहे. ध्वनी प्रदूषणावरील जो ध्वनी तीव्रतेचा नियम आहे. यात ७५ डेसिबल च्या पुढील आवाज हा ध्वनिप्रदूषनास कारणीभूत ठरतो असे म्हटले आहे. पण आताची परिस्थिती पूर्वीच्या परिस्थिती पेक्षा वेगळी आहे. चौकात जरी जाऊन ध्वनीची तीव्रता तपासली तरी ती ७५ डेसिबल च्या वर जाते. असेहि ते म्हणाले.

https://www.facebook.com/policenama/videos/694574634245096/

Loading...
You might also like