या ‘पायजामा पॉपस्टार’ला लागली मोठी ‘लॉटरी’, लवकरच बनणार अभिमन्यूची ‘हिरोईन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – क्युट चेहरा असणारी आणि युट्युब सेंसेशन म्हणून ओळखली जाणारी शर्ली सेतिया हिला एक मोठी लॉटरी लागली आहे. ही लॉटरी पैशांची नसून एक मोठी संधी आहे. कारण शर्लीला थेट मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. निकम्मा या आगामी सिनेमातून ती डेब्यू करणार आहे. युट्युबवरून शर्ली थेट आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमात शर्लीसोबत अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी दिसणार आहे. शब्बीर खान हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे.

शर्ली मुख्य करून पॉप गाण्यांसाठी ओळखली जाते. ती न्युझिलंडची सिंगर आहे. युट्युबवर शर्लीचे कोट्यवधी सब्सक्राईबर आहेत. युट्युबवर शर्ली खूपच लोकप्रिय आहे. तिला आणखी एका अनोख्या नावाने ओळखले जाते. अनेकजण तिला पायजमा पॉपस्टार म्हणून ओळखतात. याला खास कारण आहे ते म्हणजे तिने जेव्हा युट्युबवर एन्ट्री केली तेव्हा पाजम्यात एन्ट्री केली होती. त्यामुळे ती पायजमा पॉपस्टार म्हणून ओळखली जाते. एवढेच काय तर टी सीरीजच्या एका व्हिडीओत ती पायजमा घालून दिसली होती.

तुम्हाला माहिती आहे का की, सोशलवर लोकप्रिय होण्यापूर्वी शर्ली आरजे होती. शो टाईम विद शर्ली हा तिचा शो रेडिओ तरानावर प्रसारीत होत होता. टी सीरीजने आयोजित केलेल्या एका कॉन्टेस्टमध्ये शर्लीने भाग घेतला होता आणि शर्ली लोकप्रिय झाली. लवकरच हिरोईन होणाऱ्या या शर्लीचा जन्म भारतात झाला आहे. परंतु लहानपणीच ती आपल्या कुटुंबासोबत न्युझिलंडला स्थायिक झाली. दोन वर्षांपूर्वीच ती मुंबईत परतली आहे.

आपल्या पदार्पणाबाबत बोलताना शर्ली म्हणते की, “यापेक्षा चांगले पदार्पण माझ्यासाठी दुसरे असू शकत नाही. कारण आंतरराष्ट्रीय स्टुडिओ या सिनेमाशी जोडला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शब्बीर खान यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.” आपल्या डेब्यूला घेऊन शर्ली खूपच उत्सुक आहे.

निकम्मा सिनेमाबाबत सांगायचे झाले तर अॅक्शन, रोमान्स, इमोशनने भरपूर हा सिनेमा असणार आहे. या सिनेमाचे फर्स्ट लुकही समोर आले आहे. 2020 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –