मॅच दरम्यान युझवेंद्र चहलच्या खिलाडूवृत्तीचे जगभरातून कौतुक

नवी दिल्ली : 
आशिया कपच्या निमित्ताने बुधवारी भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारताने सामना जिंकला. या सामन्यात भारतीय संघाने अनेकांची मने जिंकली. या विजयाबरोबरच विशेष कौतुकाचा विषय ठरला तो भारतीय गोलंदाज युझवेंद्र चहल. युजवेंद्रने ४३ व्या षटकात पाकिस्तानच्या उस्मान खान या खेळाडूच्या शूजची लेस बांधला मदत करून आपल्या खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवले.
पाकिस्‍तानची खेळी शेवटच्‍या टप्‍प्‍यात आली होती. पाकिस्‍तानी क्रिकेटर उस्‍मान खान आणि  महंमद अामिर मैदानावर होते. तेव्‍हा उस्‍मान खानच्‍या बूटाची लेस सुटली. भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलने कोणताही मनात संकोच न ठेवता खाली वाकून उस्‍मानच्‍या बूटाच्‍या सुटलेली लेस बांधली. हाच क्षण सोशल मीडियायवर अवघ्या काही सेकंदांमध्ये चर्चेचा विषय ठरला. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील सोशल मीडिया युजर्सनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयी ट्विट करत युझवेंद्रच्या या कृतीची प्रशंसा केल्याचं पाहायला मिळालं.

टीम इंडियाला आणखी दोन झटके

अनेकांनी तर हाच सामन्यातील सर्वात सुरेख क्षण असल्याचंही म्हटलं. तर काहींनी या क्षणाला दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या नात्याशी जोडत खेळाच्या माध्यमातून देशही जोडले जाऊ शकतात, आणि आम्हालाही याच गोष्टीने जोडून ठेवलं आहे, ही  बाब  दर्शवली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b26a0008-bcd4-11e8-8014-3b09209a979c’]